Disqualification : सासूचे अतिक्रमण सुनेला, तर पतीचे पत्नीला भोवले; ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई

Disqualification : सासूचे अतिक्रमण सुनेला, तर पतीचे पत्नीला भोवले; ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई

0

Disqualification : नगर : अकोले तालुक्यातील राजकीयदृष्ट्या (Politically) अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या समशेरपूर या ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांना अतिक्रमण प्रकरणी अपात्र (Disqualification) करण्याचा निर्णय नगरच्या जिल्हाधिकारी (Collector) सिद्धाराम सालीमठ यांनी घोषित केला.

नक्की वाचा: शिर्डी विमानतळाच्या नवीन इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

याबाबत सविस्तर वृत्त असे,

की दत्तू रामनाथ भरीतकर यांनी माया योगेश भरीतकर यांच्या सासूचे नावे एकत्र कुटुंबाचे अतिक्रमण असल्यामुळे त्यांना समशेरपूर या ग्रामपंचायतीच्या सदस्य पदावर अपात्र करावे, म्हणून अ‍ॅड. गोरक्ष पालवे यांच्यामार्फत नगर येथील जिल्हाधिकारी यांच्याकडे विवाद सादर केलेला होता. त्याचबरोबर दीपक दत्तात्रेय जगताप यांनी देखील समशेरपूर ग्रामपंचायतच्या सदस्य जनाबाई माधव साळवे यांना त्यांच्या पती व पत्नी यांचे एकत्रित कुटुंबाचे अतिक्रमण असल्यामुळे त्यांना देखील समशेरपूर या ग्रामपंचायतीच्या सदस्य पदावरून अपात्र करण्यासाठी अ‍ॅड. गोरक्ष पालवे यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला होता.

अवश्य वाचा: नगर जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर

अतिक्रमण असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे कारवाई (Disqualification)

दोन्ही अर्जाची गुणवत्तेवर सुनावणी झाल्यानंतर माया योगेश भरीतकर यांच्या सासूचे अतिक्रमण असल्याची बाब निष्पन्न झाली. जनाबाई माधव साळवे यांच्या पती-पत्नीचे अतिक्रमण असल्याचे बाब निष्पन्न झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी माया योगेश भरीतकर व जनाबाई माधव साळवे या दोन ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. अर्जदार दत्तू रामनाथ भरीतकर व दीपक दत्तात्रेय जगताप यांच्यातर्फे अ‍ॅड. गोरक्ष पालवे यांनी युक्तिवाद केला. त्यांना अ‍ॅड. गुरविंदर पंजाबी, रोहित बुधवंत, प्रवीण निंबाळकर, विवेक बडे, धनश्री खेतमाळी, विशाल वांढेकर, राहुल दहिफळे, पुष्कराज बिडवाई, तेजस राख, बाळकृष्ण गिते यांनी साहाय्य केले.