Disqualification of MLA : नगर : शिवसेनेच्या (Shiv Sena) १६ आमदारांच्या अपात्रेप्रकरणाच्या निकालाचं लेखन करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) २१ जानेवारीपर्यंत वेळ वाढवून मागितला होता. पण, सर्वोच्च न्यायालायनं राहुल नार्वेकरांना थोडासा दिलासा दिला आहे. शिवसेना आमदार अपात्रता (Disqualification of MLA) प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्यासाठी १० जानेवारीची मुदत राहुल नार्वेकरांना न्यायालयानं दिली आहे.
अवश्य वाचा : वाळू धाेरणात आणखी सुधारणा करणार : राधाकृष्ण विखे पाटील
अधिवक्ता तुषार मेहता यांनी राहुल नार्वेकरांच्यावतीनं सर्वोच्च न्यायालयाकडे तीन आठवड्यांचा वेळ मागितला. तर, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी अध्यक्षांकडून वेळकाढूपणा होत असल्याचा युक्तिवाद केला होता. पण, सर्वोच्च न्यायालयानं राहुल नार्वेकरांना १० जानेवारीपर्यंत वेळ दिला आहे.
नक्की वाचा : राम शिंदे साहेब सांगतील त्या पद्धतीने होईल’ : अजित पवार