Distribution of grain : ”धान्य वाटप मशिन सर्व्हरच्या अडचणी सोडवा”

Distribution of grain : ''धान्य वाटप मशिन सर्व्हरच्या अडचणी सोडवा''

0
Distribution of grain : ''धान्य वाटप मशिन सर्व्हरच्या अडचणी सोडवा''
Distribution of grain : ''धान्य वाटप मशिन सर्व्हरच्या अडचणी सोडवा''

Distribution of grain : श्रीरामपूर : गेल्या काही दिवसापासून धान्य वाटप (Distribution of grain) करणाऱ्या मशिनच्या सर्व्हरला (Machine Server) अडचण येत असल्यामुळे दुकानदारांना जुलै महिन्याचे धान्य वाटप करता आले नाही. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पुढाकाराने ही समस्या लवकरच सुटेल व कार्डधारकांना हक्काचे रेशन तसेच दुकानदारांनाही वाटप करणे सुरळीत होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे (Mangesh Chiwte) यांनी दिले.

नक्की वाचा: रिव्हॉल्वरचा धाक दाखवून ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण करणारे आरोपी जेरबंद

स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने निवेदन

मंगेश चिवटे हे श्रीरामपूर भेटीस आले असता अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने दुकानदारांच्या विविध अडचणी संदर्भात निवेदन दिले व दुकानदारांच्या मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यत पोहोचवा, अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली. गेल्या पंधरा दिवसापासून धान्य वाटप करणारे पाँज मशिनचे सर्व्हर बंद असल्यामुळे जुलै महिन्याचे धान्य वाटप करण्यास अडथळे येत आहेत. कार्डधारक व दुकानदारही मशिन बंद असल्यामुळे वैतागले आहेत. कार्डधारक चकरा मारत असून तो राग दुकानदारावरच व्यक्त केला जात आहे. दुकानदारांचे मागील भरलेले पैसे त्वरीत मिळावे कमिशनमध्ये वाढ करावी पाँज मशिन विना अडथळा सुरु रहावी धान्य वाटप करताना येणारे सर्व अडथळे दुर करावेत कोरोना काळात वाटप केलेल्या मोफत धान्याचे ( कँरी फाँरवर्ड ) पैसे त्वरीत मिळावे, अशा मागण्याचे निवेदन त्यांना दिले. यावेळी तुमच्या मागण्या मुख्यमंत्र्यांकडे पोहोच करू व दुकानदारांना न्याय मिळवुन देवू असे आश्वासन चिवटे यांनी दिले.

अवश्य वाचा: संत सदगुरु गोदड महाराजांचा रथोत्सव उत्साहात साजरा

दुकानदारांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक (Distribution of grain)

यावेळी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी दुकानदाराच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक असुन तुमच्या मागण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे, असेही कांबळे म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष देविदास देसाई, सचिव रज्जाक पठाण, प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे, तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले, भाऊसाहेब वाघमारे, अजीज शेख, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, डाॅ. संजय फरगडे ,सद्दाम जाकीर, शेख मंगेश, छतवाणी शेतकरी सेना प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव, अनिल मोरे, सांगर कुदळे, विशाल दुर्गे, संतोष कांबळे, संजय बाहुले, आबासाहेब नाळे, कमलेश महांकाळे, सुनिल कारले तसेच मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here