District Bank : जिल्हा बँकेकडून पीककर्जाची वसुली; शिवसेनेच्या नेत्यांकडून आक्रमक पवित्रा

District Bank : जिल्हा बँकेकडून पीककर्जाची वसुली; शिवसेनेच्या नेत्यांकडून आक्रमक पवित्रा

0

District Bank : नगर : जिल्हा बँकेकडून (District Bank) पीककर्जाची वसुली सुरु आहे. परंतु, नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांकडून केवळ कर्ज (loan) मुद्दल रकमेची वसुली करण्याचे सांगितले आहे. असे असले तरी जिल्हा बँकेकडून व्याजाच्या रकमेची आकारणी करण्यात येत असल्याचा आरोप करत ही व्याजाची वसुली (Recovery) थांबवावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदेश कार्ले (sandesh karle) यांनी केली. तसे निवेदन त्यांनी उपनिबंधकांना दिले. बँक अंमलबजावणी करत नाही, असे लक्षात आल्याने लगेच ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.

हे देखील वाचा: नवनीत राणांना पाडणार; बच्चू कडूंनी केला निर्धार

सहकार आयुक्तांना पुन्हा स्मरण पत्र (District Bank)

यावेळी माजी सभापती रामदास भोर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ, माजी सभापती संदीप गुंड, पंचायत समितीचे माजी सदस्य गुलाब शिंदे, भाऊ तापकीर आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, पीककर्जाची नियमित परतफेड करत असलेल्या शेतकऱ्यांकडून फक्त कर्ज मुद्दल रकमेची वसुली करण्याबाबत पत्र सहकार आयुक्त यांनी १४ मार्च रोजी दिले. बँका त्यास दाद देत नसल्याने पुन्हा सहकार आयुक्त यांना २७ मार्च रोजी पुन्हा स्मरण पत्र देण्यात आलेले आहे. 

District Bank

नक्की वाचा: पाय घसरून पडल्याने दिलीप वळसे पाटील जखमी

बँकेने अंमलबजावणी न केल्यास कारवाई (District Bank)


तथापी दुष्काळी परिस्थितीमध्येही जिल्हा बँकेकडून व्याजाच्या रकमेची आकारणी करण्यात येत आहे.  शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय असून उपरोक्त पत्राची जिल्हा बँकेकडून अंमलबजावणी झालेली नसल्याचे दिसून येते. तरी उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे व्याज न घेण्याबाबत पुन्हा आपल्या स्तरावरून योग्य तो आदेश निर्गमित करावा, म्हणून ठिय्या आंदोलन करण्यात आले, दोन तीन तासांनंतर जिल्हा उपनिबंधक यांनी आंदोलक यांना बँकेस या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे लेखी पत्र आंदोलकांना व बँकेसही दिले. बँकेने ही अंमलबजावणी न केल्यास कारवाईस सामोरे जावे लागेल, असे आश्वासन ही देण्यात आले. त्यानंतर ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले, असे आंदोलकांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here