District Central Cooperative Bank Limited : नगर: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित (District Central Cooperative Bank Limited), आहिल्यानगर भक्कम पायावर उभी असून बँकेची आर्थिक परिस्थिती अतिशय सुदृढ असल्याने आणि जिल्हा बँकेवर पूर्ण विश्वास असल्याने जिल्ह्यातील ठेवीदारांनी आपली ठेव रक्कम जिल्हा बँकेत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून आज नववर्षाच्या एक तारखेलाच बँकेचे अकरा हजार तीन कोटीच्या रक्कमेच्या ठेवी झाले असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले (Chandrashekhar Ghule) यांनी दिली. जिल्ह्याच्या विकासासाठी शेतकरी केंद्रबिंदू मानून बँकेचे संचालक मंडळ आणि अधिकारी कर्मचारी हे नेहमीच तत्परतेने कामकाज करत असून त्यामुळे आणि जिल्ह्यातील सर्वसामान्यांचा मोठा विश्वास बँकेवर असल्याने बँकेची प्रगतीची घोडदौड अतिशय वेगाने चालू आहे बँकेच्या ठेवीवरील व्याजदर हा अतिशय चांगला असून बँकेमध्ये सुरक्षित ठेव वाटत असल्याने ठेवीदार बँकेमध्ये आपल्या ठेवी ठेवत आहेत, अशी माहिती देऊन अध्यक्ष घुले यांनी दिली.
अवश्य वाचा: अहिल्यानगरमध्ये पाच उमेदवार बिनविरोध नगरसेवक; भाजपचे तीन तर राष्ट्रवादीचे दोन
ग्राहकांना फायदा होण्याकरता ८ टक्के व्याजदर
बँक आता ग्राहकांकरिता सोने तारण कर्जामध्ये जास्तीत जास्त ग्राहकांना फायदा होण्याकरता अल्प दरात म्हणजेच ८ टक्के व्याजदराने व प्रतितोळा ८२ हजार रकमे इतका आणि प्रति व्यक्ती ५ लाख कर्ज मर्यादा प्रमाणे सोनेतारण कर्ज उपलब्ध करत असून गेल्या दोन महिन्यात जिल्हा बँकेचे सोने कर्जात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेले आहे सध्या बॅकेच्या ९३ शाखा मध्ये सोनेतारण कर्ज सुविधा उपलब्ध असून नजीकच्या काळात १६० शाखांमध्ये सोनेतारण कर्ज उपलब्ध करणार असल्याची माहिती घुले यांनी दिली.
नक्की वाचा : विखे–जगताप एक्स्प्रेस सुसाट; पाच नगरसेवक बिनविरोध
स्वयंचलित बँकिंग सेवा उपलब्ध करणार (District Central Cooperative Bank Limited)
बँकेने नुकतेच बिल पेमेंट घेण्याकरता ग्राहकांसाठी क्यूआर कोड उपलब्ध करून दिला असून जिल्ह्यातील व्यापारी, ग्राहक, सहकारी संस्था, ग्रामपंचायत, शाळा, कॉलेज,खाजगी संस्था आदींनी जिल्हा बँकेचा क्यूआर कोड घेऊन आपला व्यवहार सुरक्षित आणि जलद उपलब्ध करून घेण्याचे आवाहन घुले यांनी केले. बँक आता आधुनिक तंत्रज्ञानाकडे वाटचाल करत असताना पुढचे पाऊल म्हणून लवकरच अहिल्यानगर येथील मुख्य कार्यालयाच्या इमारतीमध्ये बँकेची ई लॉबी ही ग्राहकांना २४×७ म्हणजेच दिवस-रात्र स्वयंचलित बँकिंग सेवा देण्यासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या ईलॉबीमध्ये एटीएम, कॅश डिपॉझिट मशीन, पासबुक प्रिंटर, चेक डिपॉझिट मशीन, बँकिंग की ऑक्स, तक्रार नोंदणी सुविधा इत्यादी सेवा एकाच ठिकाणी ई लॉबीमार्फत उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या ईलॉबीचे काम प्रगतीपासून पथावर असून लवकरच त्याचे उद्घाटन करणार असल्याची माहितीही घुले यांनी दिली.



