District Collector : ‘प्रशासन गाव की ओर’ उपक्रम यशस्वीपणे राबवा : जिल्हाधिकारी सालीमठ

District Collector : 'प्रशासन गाव की ओर' उपक्रम यशस्वीपणे राबवा : जिल्हाधिकारी सालीमठ

0
District Collector : 'प्रशासन गाव की ओर' उपक्रम यशस्वीपणे राबवा : जिल्हाधिकारी सालीमठ
District Collector : 'प्रशासन गाव की ओर' उपक्रम यशस्वीपणे राबवा : जिल्हाधिकारी सालीमठ

District Collector : नगर : जिल्ह्यात १९ ते २४ डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताहांतर्गत ‘प्रशासन गाव की ओर’ हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा आणि नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी (District Collector) सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात (District Collector’s Office) दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे आदी उपस्थित होते.

नक्की वाचा : आंबेडकरवादी समाजाची कचेरीसमोर निदर्शने; परभणी घटनेचा केला निषेध

सालीमठ म्हणाले, (District Collector)

कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करावे. विविध महामंडळांनी लाभार्थ्यांना योजनांचा लाभ द्यावा. नाविन्यपूर्ण कल्पना वापरून नागरिकांना विविध सेवा सुलभपणे उपलब्ध करून द्याव्यात. गाव कचरामुक्त किंवा प्लास्टिकमुक्त करण्यासाठी उपक्रम राबवावे. शासकीय विभागांद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा अधिक सुलभपणे नागरिकांना मिळतील, असे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.