District Collector : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी नवीन वर्षाच्या प्रारंभी घेतले मोहटादेवीचे दर्शन

District Collector : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी नवीन वर्षाच्या प्रारंभी घेतले मोहटादेवीचे दर्शन

0

District Collector : पाथर्डी : तालुक्यातील श्रीक्षेत्र मोहटादेवी (Mohatadevi) येथे जिल्हाधिकारी (District Collector) सिद्धराम सालीमठ यांनी सहकुटुंब श्रीजगदंबा मोहटादेवीचे नववर्षानिमित्त (New Year) दर्शन घेऊन देवीची महापूजा केली. यावेळी मिनाक्षी सालीमठ, वेदांत सलीमठ, पाथर्डीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार डॉ.उद्धव नाईक, देवस्थान समितीचे विश्वस्त शशिकांत दहिफळे, डॉ. श्रीधर देशमुख, डॉ.ज्योती देशमुख, लता दहिफळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, भीमराव खाडे आदी उपस्थित होते.

नक्की वाचा : देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांचे रक्ताचे डाग धुवून त्यांना सरकारमध्ये घेतलं?;संजय राऊतांचा सवाल

मोहटादेवीची सायंकाळची आरती करून दर्शन घेतले

पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मोहटा याठिकाणी मोहटा देवीचे जागृत स्थान आहे. लाखो देवी भाविक मोठ्या श्रद्धेने मोहटादेवीच्या दर्शनासाठी वर्षभर येत असतात. त्याच श्रध्देने अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आपल्या कुटुंबासमवेत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी बुधवारी (ता.१) मोहटादेवी गडावर येऊन मोहटादेवीची सायंकाळची आरती करून दर्शन घेतले.

अवश्य वाचा : गणेश मूर्तिकार वरील कारवाई थांबावी; संघटनेचे सभापती राम शिंदे यांना निवेदन

देवस्थान समितीतर्फे सालीमठ यांचा सत्कार (District Collector)

देवस्थान समितीतर्फे सिद्धाराम सालीमठ यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. मोहटा देवस्थानाच्या विकासामध्ये नेहमी सकारात्मकरित्या आपला प्रयत्न करू. त्यासाठी देवस्थान समितीतर्फे तीर्थक्षेत्र व पर्यटन विकास योजनेचे प्रस्ताव सादर करा त्यावर आपण प्रभावीपणे काम करू असे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी देवस्थान समितीला आश्वासित केले.