District Collector : नगर : शेवगाव शहरासाठी नगरोत्थान योजनेंतर्गत मंजूर झालेल्या पाणी योजनेत अनेक त्रुटी असून सध्या सुरू असलेले काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याने सर्व पक्षीय शेवगाव शहर कृती समितीने सुरु असलेल्या कामावर अक्षेप घेतला आहे. कृती समितीने विविध मुद्दे मांडून पाणी पुरवठा योजनेचे (Water Supply Scheme) काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे सांगितले. योजनेचे काम व्यवस्थित होण्यासाठी जिल्हाधिकारी पंकज आशिया (Panakaj Ashiya) यांनी कृती समिती व शेवगाव नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांची बुधवारी (ता.१७) जिल्हाधिकारी (District Collector) कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
अवश्य वाचा: अतिवृष्टी बाधीत लोकांना तातडीने मदत उपलब्ध करून द्या- मंत्री विखे पाटील
उशाशी जायकवाडी धरण तरीही पाण्याचा प्रश्न प्रलंबित
यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी सर्व मुद्दे समजून घेत नगर पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विजया घाडगे यांच्याशी चर्चा करून येत्या दोन दिवसात अहवाल सादर करून पाणी पुरवठा योजनेचे काम दर्जेदार व वेगाने करण्याचे आदेश दिले. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंत्यांशी ही बोलून कामात सुधारणा करू, असे आश्वासन दिले. शेवगाव शहराच्या उशाशी जायकवाडी धरण आहे. पण शहराचा पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. २०२३ साली शहरातील पाणीपुरवठा योजनेस ,मंजुरी मिळाली. मात्र, काम सुरु होता होता २०२५ उगवले. त्यातही तांत्रिक सल्लागार समिती चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याने शेवगावच्या नगरसेवकांनी व सर्व पक्षिय पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. यासाठी अनेकदा आंदोलने झाली. मात्र, योग्य मार्ग न निघाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात व्यापक बैठकीचे आयोजन करून जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी समस्या समजून घेतले.
नक्की वाचा: मुलींच्या खांद्यावर पित्याचे पार्थिव;सात मुलींनी पार पाडले पित्याचे अंत्यसंस्कार
यावेळी कृती समितीचे सदस्य अरुण मुंढे म्हणाले की, (District Collector)
शेवगाव शहराचा विस्तार चहुबाजूनी होत आहे. मात्र, नवीन पुरवठा योजनेद्वारे सर्व भागांमध्ये सुरळीत पाणीपुरवठा होणार नाहीये. वाढत्या लोकवस्तीचा विचार करून ही योजना राबविण्यात यावी. सर्व बाबींचा विचार करता ही योजना अपुरी पडणार असून जुन्या व नव्या उभारण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाक्याही सर्व भागांमध्ये पाणीपुरवठा करण्यास कमी पडणार आहेत. याबाबत वारंवार प्रशासनास व तांत्रिक सल्लागार समितीला सांगण्यात आले मात्र, ते सहकार्य करत नाहीयेत. या गंभीर बाबींचा विचार करावा, अशी मागणी करून कामच ठेकेदार बदलण्याची मागणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अशोक आहुजा, अरुण लांडे, माजी नगरसेवक उमर शेख, कैलास तिजोरे, भाऊसाहेब कोल्हे, दत्तात्रेय फुंदे, इजाज काझी, अंकुश कुसळकर, प्रेम जाजू, अविनाश देशमुख, प्यारेलाल शेख, अमोल सागडे, अंकुश ढाकणे व अभिषेक बडे यांच्यासह शेवगाव व अधिकारी उपस्थित होते.