District Collector’s Office : चोरीच्या घटनेबाबत मेंढपाळांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश

District Collector's Office : चोरीच्या घटनेबाबत मेंढपाळांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश

0
District Collector's Office : चोरीच्या घटनेबाबत मेंढपाळांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश
District Collector's Office : चोरीच्या घटनेबाबत मेंढपाळांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश

District Collector’s Office : नगर : जिल्ह्यात वाढत चाललेल्या मेंढपाळांच्या अडवणुकीच्या घटना, चोरीचे गुन्हे (Crimes of Theft)पोलिसांच्या (Police) कथित निष्क्रिय कार्यपद्धतीविरोधात महाराष्ट्र मेंढपाळ आक्रोश आंदोलन संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (District Collector’s Office) जोरदार निदर्शने करण्यात आली.

अवश्य वाचा: ऊसतोड कामगार महिलेची रस्त्यातच प्रसुती; जेऊर परिसरात घडली घटना

मोठ्या संख्येने मेंढपाळ उपस्थित

यावेळी अध्यक्ष सखाराम सरक, अँड. कारभार गवळी, अशोक सब्बन, उपाध्यक्ष म्हंकाळ पांढरे, निलेश कोकरे, बापू खताळ, एकनाथ कोळपे, मुक्ताजी तांबे, नाथसाहेब सरक, पिराजी वाघे, देवराम कोळपे, बाळू सरक, ठाणा बरकडे, सिद्धू घुले, राम घुले, पोपट टकले, गजानन गुलाल, गजानन गुलदगड, दौलत कोळेकर, लक्ष्मण कोकरे यांच्यासह मोठ्या संख्येने मेंढपाळ उपस्थित होते.

नक्की वाचा : जामीनावर बाहेर आलेली रील स्टार कोमल काळे पुन्हा पोलिसांच्या ताब्यात

फिर्याद नोंदवण्यासाठी गेल्यावर अपमानास्पद वागणूक

२७ नोव्हेंबर २०२५ रोजी मध्यरात्री चास गावच्या हद्दीत सिद्धू बिरू घुले या मेंढपाळावर सहा अज्ञात चोरट्यांनी हल्ला करून सोने व रोकड लुटून नेली. या घटनेनंतर ११२ वर फोन केल्यावर पोलीस गाडी येऊन गेली, परंतु दुसऱ्या दिवशी फिर्याद नोंदवण्यासाठी मेंढपाळ पोलीस ठाण्यात गेल्यावर गीते यांनी “तुम्हीच चोर असून बनावट कांगावा करत आहात” अशी अपमानास्पद वागणूक देत चोरीची तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याचा आरोप संघटनेने केला. अखेर फक्त ‘गहाळ एनसी’ नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गीते यांचे तत्काळ निलंबन करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्ह्यातील प्रलंबित मेंढपाळ चोरीच्या गुन्ह्यांची तातडीने चौकशी करून मुद्देमाल परत देण्यात यावा, तसेच मेंढपाळांना चोर व बिबट्यासारख्या वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी बंदुकीचा शस्त्र परवाना देण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.


संघटनेने सांगितले की, जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये मागील अनेक वर्षांपासून मेंढपाळांच्या चोरीच्या तक्रारी प्रलंबित आहेत. काही गुन्ह्यांत आरोपींना जामीन मिळूनही पोलिसांनी मुद्देमाल परत करण्याची कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे मेंढपाळांचे आर्थिक नुकसान वाढत असून न्याय मिळण्याची आशा धूसर झाली आहे. शेतीपेक्षा जास्त स्थिर उत्पन्न देणारा मेंढपाळ व्यवसाय आज वाढत्या चोरी, दरोडे, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे संकटात सापडला आहे. सतत भीतीच्या वातावरणात कळप सांभाळणाऱ्या मेंढपाळांना स्वतःच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी शस्त्र परवाना देणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.