District Cooperative Bank : नगर : जिल्हा सहकारी बँकेत (District Cooperative Bank) संचालक मंडळाच्या मान्यतेने ६९६ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. शुक्रवार (ता. १३) इच्छुक उमेदवारांना २७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज (Online application) करता येणार आहे. बँकेची भरती (Bank Recruitment) प्रक्रिया राबवण्यासाठी पुण्याच्या (Pune) वर्कवेल इन्फोटेक कंपनीची निवड संचालक मंडळाने केलेली आहे.
नक्की वाचा: बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार
ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार
जिल्हा बँकेच्या लिपिक पदाच्या ६८७, वाहन चालकांच्या ४ आणि सुरक्षा रक्षकाच्या ५ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यासाठी उद्यापासून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहे.बँकेच्या लिपिक पदासाठी बी. कॉम, एमबीए (बँकिंग, फायनान्स) एलएसएम, डीएलटीसी यासह वाणिज्य विभागातील शिक्षणाची अट आहे. यासह बँकिंग क्षेत्रातील तीन वर्षाचा अनुभव या भरतीसाठी उमेदवारांना राहणार आहे.
अवश्य वाचा: आरक्षणासंदर्भातील खोटेपणा उघड; मंत्री विखे पाटलांची काँग्रेसवर टीका
जिल्हा बँकेत काम करण्याची संधी मिळणार (District Cooperative Bank)
बँकेच्या भरतीबाबत लेखी परीक्षेत पास झाल्यानंतर दहा गुणांची तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत तोंडी पास झाल्यानंतर जिल्हा बँकेत काम करण्याची संधी मिळणार आहे. यातही सुरूवातीच्या वर्षभर लिपिकांना १५ हजारांवर, तर वाहन चालक व सुरक्षा रक्षक यांना अवघ्या १२ हजारांत काम करावे लागणार आहे. त्यांचा परिविक्षाधिन कालावधी पूर्ण झाल्यावर ते बँकेच्या सेवत येणार आहेत. दरम्यान त्यांना ३ वर्षे बँकेची नोकरी सोडता येणार नसल्याची हमी द्यावी लागणार आहे.