District Court : नगर : जिल्हा न्यायालयाचे (District Court) द्विशताब्दी वर्ष व सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करुन बार असोसिएशनने (Bar Association) उत्कृष्ट काम केले आहे. त्यानिमित्त संवेदनशीलतेने काढलेली स्मरणिका ही संस्मरणीय, वाचनीय व पुढील पिढ्यांना मार्गदर्शक आहे. जिल्हा न्यायालयाचा २०० वर्षांचा वैभवशाली इतिहास (History) हा सतत वाचला जाऊन जतन केला गेला पाहिजे. यासाठी वकील संघटनेने काम करावे, असे प्रतिपादन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे (Anju Shende) यांनी केले.
नक्की वाचा : बिबट्याच्या हल्ल्यात तरुण ठार
विशेष स्मरणिकेचे वितरण
जिल्हा न्यायालयास २०० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने गेल्या ऑगस्ट महिन्यात एका खास दिमाखदार सोहळ्याचे आयोजन नगरमध्ये केले होते. या यानिमित्त काढण्यात आलेल्या विशेष स्मरणिकेचे वितरण प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्या हस्ते न्यायाधीश व वकिलांना मंगळवारी झाले. यावेळी जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, केंद्र सरकारचे वकील सुभाष भोर, वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. नरेश गुगळे व सचिव अॅड.संदीप शेळके आदी उपस्थित होते. यावेळी बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष राजेश कातोरे, उपाध्यक्ष वैभव आघाव, सचिव संदीप बुरके, असोसिएशनचे पदाधिकारी, न्यायिक अधिकारी व मोठ्या संख्यने वकील उपस्थित होते.
अवश्य वाचा : ‘थर्टी फस्ट’च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग अलर्ट
अॅड. नरेश गुगळे म्हणाले, (District Court)
सन १८२३ साली स्थापना झालेल्या ऐतिहासिक जिल्हा न्यायालयाचे द्विशताब्दी वर्ष सर्वांच्या सहकार्याने व सहभागाने मोठ्या उत्साहात साजरे झाले आहे. यासाठी बऱ्याच हातांनी मदत केली. न्यायालयाच्या २०० व्या वर्षपूर्ती निमित्त जुन्या इतिहासाचे वर्णन असलेली २०० पानांची स्मरणिका प्रकाशित करण्यात आली आहे. या स्मरणिकेत वकील व न्यायाधीशांचे विविध विषयांवरील लेख, वकील खासदार असलेले स्व.उत्तमचंद बोगावत व स्व.भाऊसाहेब कानवडे यांच्या वरील लेख, सर्वाना काय मार्गदर्शन करणरे स्व.जी.जी.खान, अॅड. मेहेर यांच्या सारख्या जुन्या वकीलांच्या कार्यावर लेख यासह विविध उपयुक्त माहितीचा या स्मरणिकेत समावेश आहे. ही स्मरणिका नव्या वकिलांना मार्गदर्शक ठरेल. बार असोसिएशनच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली आहे. चांगले काम करणरे पदाधिकारी या निवडणुकीत निवडून आल्याने बार चे काम चांगले चालणार आहे.
यावेळी बार उपाध्यक्ष अॅड. महेश शेडाळे, महिला सहसचिव अॅड. भक्ती शिरसाठ, खजिनदार अॅड. शिवाजी शिरसाठ, सह सचिव अॅड. संजय सुंबे, कार्यकारणी सदस्य अॅड.अमोल अकोलकर, अॅड. सारस क्षेत्रे, अॅड.विनोद रणसिंग, अॅड.देवदत्त शहाणे, अॅड.शिवाजी शिंदे, अॅड.रामेश्वर कराळे, अॅड.अस्मिता उदावंत आदींसह माजी पदाधिकारी, वरिष्ठ वकील उपस्थित होते.
या स्मरणिकेसाठी मुख्य संपादक अभय राजे, गौरव दांगट, सुयोग गुगळे, नितीन खैरे, रामेश्वर काराळे यांनी स्मरणिकेसाठी योगदान दिले. सूत्रसंचालन अभय राजे यांनी केले, सचिव अॅड. संदीप शेळके यांनी आभार मानले.