District Development Plan : नगर : नगर जिल्हा विकासाचा सांख्यिकी आराखडा (District Development Plan) तयार करणारा राज्यातील पहिला जिल्हा आहे. औद्योगिक (Industrial) आणि तीर्थक्षेत्र पर्यटनातून (Pilgrimage tourism) होणारी गुंतवणूक व्यापारी पेठेवरही सकारात्मक परिणाम करण्यास कारणीभूत ठरेल, असा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केला.
अवश्य वाचा: मांजरीचा जीव वाचवताना विहिरीत गुदमरून पाच जणांचा मृत्यू
व्यापाऱ्यांशी साधला संवाद
नगर आडते बाजार मर्चन्टस असोसिएशन व कांदा भाजीपाला असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी व्यापारी क्षेत्रातील सर्व घटकांशी संवाद साधला. आमदार संग्राम जगताप, अध्यक्ष अशोक गांधी, उपाध्यक्ष गोपाल मणियार, सेक्रेटरी संतोष बोरा, राजेंद्र बोरा, अशोक लाटे, भाजपाचे अध्यक्ष अभय आगरकर माजी नगराध्यक्ष वसंत लोढा, धनंजय जाधव, निखिल वारे आदी उपस्थित होते.
हे देखील वाचा: ‘संपदा पतसंस्था’ घोटाळा प्रकरण; पाच आरोपींना जन्मठेप
मंत्री विखे पाटील म्हणाले (District Development Plan)
”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची परिस्थिती आज बदलत आहे. कोराेनाच्या संकटानंतरही देशाची अर्थव्यवस्था स्थिर करण्यासाठी केलेल्या उपाययोजनामुळे आज भारताची अर्थव्यवस्था प्रगतीच्या दिशेने जात आहे. जगातील इतर देशाची परिस्थिती पाहिली, तर भारत देश अर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याचे चित्र आहे. देशाचा विकास साध्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुटपाथवरील विक्रेत्यापासून ते उद्योजकापर्यत सर्वांनाच पाठबळ देण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांचे प्रयत्न देशाच्या अर्थव्यवस्थेला पाच ट्रिलीयन डाॅलर अर्थव्यवस्थेचा मार्ग अधिक सुकर करून देईल, अशी अपेक्षा विखे पाटील यांनी व्यक्त केली.
नगर जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा (District Development Plan) तयार करण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने औद्योगिक विकासाला प्राधान्य देण्यात आल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले, ”तीर्थक्षेत्राचा विकास करून नवी बाजारपेठ विकसित करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्याचा सांख्यिकी आराखडा तयार केला आहे. या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शहरातील बाजारपेठेची परंपरा खूप मोठी आहे. शहराच्या व जिल्ह्याच्या विकासात (District Development Plan) व्यापारी बंधूचे योगदान खूप मोठे आहे. केंद्र सरकारकडे वस्तू सेवा करातील अडचणी सोडविण्याची ग्वाही देताना आतापर्यंत अर्थमंत्र्यांनी घेतलेल्या परिषदांमधून जीवनावश्यक वस्तूवरील कर रद्द किंवा कमी करण्याचा निर्णय करून जनतेला आणि व्यापारी वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आता हा कर भरण्यात सुद्धा सुसूत्रता आली असल्याचे विखे पाटील म्हणाले.