District Skill Development : ‘जागेवर निवड संधी’ उपक्रमाचे ११ फेब्रुवारी रोजी आयोजन

District Skill Development : ‘जागेवर निवड संधी’ उपक्रमाचे ११ फेब्रुवारी रोजी आयोजन

0
District Skill Development : ‘जागेवर निवड संधी’ उपक्रमाचे ११ फेब्रुवारी रोजी आयोजन
District Skill Development : ‘जागेवर निवड संधी’ उपक्रमाचे ११ फेब्रुवारी रोजी आयोजन

District Skill Development : नगर : जिल्हा कौशल्य विकास (District Skill Development), रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने (Employment and Entrepreneurship Guidance Center) नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी ‘जागेवर निवड संधी’उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी पूर्ण करून प्रत्यक्ष उपस्थित राहावे व रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त रविकुमार पंतम (Ravi Kumar Pantam) यांनी केले आहे.

नक्की वाचा: अहिल्यानगर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींवर प्रशासकराज!

दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी आयाेजन

हा उपक्रम बुधवार, दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय इमारत, पहिला मजला, टी.व्ही. सेंटरजवळ, अहिल्यानगर येथे होणार आहे.

अवश्य वाचा : त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर; आता मंत्रिमंडळात होणार मोठा निर्णय?

जागेवरच नोकरीच्या संधी उपलब्ध (District Skill Development)

या उपक्रमात एनसाईज बाय सयाजी (हॉटेल) व साई इन्फोटेक, अहिल्यानगर या दोन खासगी आस्थापना सहभागी होणार आहेत. उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. आयटीआय , डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी जागेवरच नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.

नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप सेवायोजन नोंदणी केली नसल्यास, त्यांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी. त्यानंतर लॉगिन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावा. तसेच, उपक्रमाच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखती द्याव्यात.

उमेदवारांनी www.ncs.gov.in या राष्ट्रीय करिअर सेवा संकेतस्थळावरही नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी समन्वयक वसीमखान पठाण (मो. ९४०९५५५४६५) यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.