
District Superintendent of Police : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील रुईछत्तीसी (Ruichattisi) येथील काही नागरिकांनी त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हा (Crime) खोटा असल्याचा आरोप करत समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे (District Superintendent of Police) निवेदन सादर केले आहे. यावेळी नगरसेवक अशोक गायकवाड़, सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड़, किरण दाभाडे, प्रशांत छत्तिसे, सिध्दार्थ आढाव, अक्षय भिंगारदिवे, विवेक गायकवाड आदींसह समस्त आंबेडकर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता.
नक्की वाचा : जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात; साडेसहा हजाराची मागितली लाच
निवेदनात म्हटले आहे की,
अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा ७ मार्च २०२६ रोजी विविध कलमान्वये संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा फिर्यादी सागर नामदेव जगदाळे (रा. रुईछत्तीसी) यांनी खोट्या व बनावट कथनांच्या आधारे दाखल केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सखोल चौकशीची मागणी (District Superintendent of Police)
फिर्यादीने घटनेची वेळ ३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२.१० अशी नमूद केली आहे. मात्र, त्या वेळेस संबंधित अर्जदार हे अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा संदर्भात फिर्याद देण्यासाठी उपस्थित होते. याची नोंद २ फेब्रुवारी रोजी रात्री ११.४७ वाजता झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. रुईछत्तीसी गाव हे पोलीस ठाण्यापासून सुमारे २५ ते ३० किलोमीटर अंतरावर असल्याने नमूद वेळेत घटना घडणे शक्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. बाहेरील जिल्ह्यात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या दबाव खाली खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोपही निवेदकांनी केला आहे. याची सखोल चौकशी करण्याची मागणी ही निवेदनकर्त्यांनी केली आहे.
या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी २ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११ ते ३ फेब्रुवारी रोजी १२.४० या कालावधीतील पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी त्यांनी केली आहे.


