नगर : महाराष्ट्राची युवा बुद्धिबळपटू (Young Chess Player Of Maharashtra) दिव्या देशमुखने (Divya Deshmukh) मोठा इतिहास रचला आहे. जॉर्जिया देशातील बटुमी शहरात पार पडलेल्या महिला बुद्धिबळ वर्ल्ड कपच्या (Women’s Chess World Cup) अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने अनुभवी आणि उच्च मानांकन असलेल्या कोनेरू हम्पीचा (Koneru Humpy) पराभव करत हे प्रतिष्ठेचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे.असे विजेतेपद पटकवणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे.
नक्की वाचा : शुभमन गिलची ऐतिहासिक कामगिरी!मँचेस्टर कसोटी सामन्यात कॅप्टनने मोडले अनेक रेकार्ड
सामन्याच्या मुख्य फेऱ्यांमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये एक रोमांचक सामना पाहायला मिळाला. दिव्याने कोणतीही चूक न करता हम्पीला ड्रॉवर रोखले आणि सामना टायब्रेकरपर्यंत नेला. टायब्रेकरमध्ये काळ्या मोहरांवर खेळताना दिव्याने अत्यंत हुशारीने आणि आत्मविश्वासाने खेळ करत निर्णायक विजय मिळवला.बुद्धिबळाच्या या सामन्यात एक क्षण असा आला होता, जिथे हम्पीकडे पुन्हा सामन्यात परतण्याची संधी होती. मात्र, ती त्या संधीचं रूपांतर विजयात करू शकली नाही. दुसरीकडे, दिव्याने कोणताही चुक न करता ऐतिहासिक कामगिरी केली आणि महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप जिंकला.
अवश्य वाचा : ‘सैयारा’चा बॉक्स ऑफिसवर धमाका!९ दिवसांत कमावले तब्बल २२० कोटी
विजयानंतर दिव्या देशमुख झाली भावुक (Divya Deshmukh)
नागपूरची १९ वर्षांची दिव्या देशमुख आता केवळ वर्ल्ड कप विजेती राहिली नाही,तर तिने या ऐतिहासिक विजयासोबत ग्रँडमास्टरचा मानही मिळवला आहे. या क्षणी दिव्या भावूक झाली होती. तिच्यासाठी हे आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरले. विशेष म्हणजे, दिव्या आधीच ‘कँडिडेट्स टूर्नामेंटसाठी पात्र ठरली आहे, जे बुद्धिबळ विश्वविजेतेपदाच्या वाटचालीतलं एक महत्त्वाचं पाऊल आहे.
दिव्या देशमुखला ‘हे’ पारितोषिक मिळणार (Divya Deshmukh)
महिला वर्ल्ड कप २०२५ जिंकणाऱ्या दिव्या देशमुखला विजेतेपदाबरोबरच सुमारे ४२ लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. उपविजेती कोनेरू हम्पी हिला ३५,००० डॉलर्स म्हणजेच सुमारे ३० लाख रुपये मिळाले. या दोन्ही खेळाडूंनी बुद्धिबळातील अत्यंत प्रतिष्ठेच्या कँडिडेट्स टूर्नामेंटसाठी पात्रता मिळवली आहे, जे विश्वविजेतेपदाच्या दिशेने एक मोठं पाऊल मानलं जातं. भारतामध्ये बुद्धिबळाचं क्रेझ वेगाने वाढत आहे. त्यामुळे या दोघींनाही नवीन स्पॉन्सर्स, ब्रँड डील्स आणि व्यावसायिक संधी मिळण्याची शक्यता प्रचंड आहे.