Diwali : अंधांच्या ‘स्वर दीपावली’ संगीत मैफिलीचे रविवारी आयोजन

0
Diwali : अंधांच्या 'स्वर दीपावली' संगीत मैफिलीचे रविवारी आयोजन
Diwali : अंधांच्या 'स्वर दीपावली' संगीत मैफिलीचे रविवारी आयोजन

Diwali : नगर : दिव्यदृष्टी संस्थेने नगर शहरातील सावेडी येथील माऊली सभागृहात रविवारी (ता. २७) सायंकाळी ६ ते ९ यावेळेत ‘स्वर दीपावली’ (Diwali) या अनोख्या संगीत मैफिलीचे आयोजन केले आहे. स्वतः अंध- दिव्यांग (Blind-disabled) असणारे कलाकार या संगीत मैफिलीत (Music Concert) गायन वादन यांचे सादरीकरण करणार आहे. रसिक नगरकर यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन दिव्यदृष्टी संस्थेने केले आहे.

नक्की वाचा: शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर

मैफिलीला उपस्थित राहण्याचे आवाहन

या स्वर मैफिलीचे उद्घाटन आदर्शगाव चळवळीचे प्रणेते पद्मश्री पोपटराव पवार, हॉटेल व्यावसायिक धनेश बोगावत, जगप्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे, नवोदित सिनेअभिनेते महेश काळे, उद्योजक एन. बी. धुमाळ, ब्रिगेडियर राजू चावला यांच्या उपस्थित होणार आहे. तरी जास्तीत जास्त नगरकर यांनी या दिव्यदृष्टी संस्थेला पाठबळ व मैफिलीला उपस्थित राहण्याचे आवाहन दिव्यदृष्टीचे कृष्णा तवले, धवण उम्रेडकर, निलेश शिंदे, सुभाष शिंदे, सुनील बाचकर, किरण खेतमाळस यांनी केले आहे.

अवश्य वाचा: माझ्यावर हल्‍ला करण्‍याचा कट : सुजय विखे पाटील

या अंधांची ऐकायला मिळणार संगीत साधना (Diwali)

गांधर्व विश्व विद्यालय व सुगम संगीत विद्यालय द्वारा संगीत विशारद निलेश शहादेव शिंदे, सुहास नरवडे तसेच अलका शिंदे, वर्षा पड्याळ हे या मैफिलीत गाणार आहेत. अंकुश जाधव, मनोज धावारे, स्वप्नील पड्याळ, सौदागर लोंढे , सलीम अत्तार , महेश नेऊल आदी कलाकार आपल्या संगीत सहभागातून या मैफिलीत उपस्थितांची मने रिझवणार आहेत. निवेदक नितीन जावळे या मैफिलीचे सूत्रसंचालन करणार आहेत.

अंध-अपंग-मूकबधिर यांचे जीवन स्वावलंबी करण्यासाठी झगडणाऱ्या स्वतः दिव्यांग- अंध असणाऱ्यांची दिव्यदृष्टी ही संस्था नव्याने नगर शहर व जिल्ह्यात दिव्यांग यांच्या शिक्षणासाठी कार्यरत झाली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष कृष्णा तवले, संचालक सुभाष शिंदे, सचिव ढवण उम्रेडकर यांनी माध्यमांना सांगितले आहे.