Diwali Bonus : तीन महिने आधीच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

Diwali Bonus : तीन महिने आधीच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

0
Diwali Bonus : तीन महिने आधीच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर
Diwali Bonus : तीन महिने आधीच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर

Diwali Bonus : नगर : नगर महापालिका कामगार युनियन व मनपा (AMC) प्रशासनाची आज संयुक्त बैठक झाली. या बैठकीत महापालिका कामगारांना दिवाळी (Diwali Bonus) सणासाठी ११ हजार रुपये सानुग्रह अनुदान (Grant) मंजूर केले आहे.

नक्की वाचा: एलसीबी विरोधातील तक्रारींची १५ दिवसांत चौकशी; आश्वासनानंतर खासदार लंकेंचे उपोषण मागे

मनपा प्रशासनाने व कामगार यूनियनबरोबर बैठक

नगर महापालिका कामगार यूनियनची महापालिका प्रशासनाला दिवाळी सणासाठी सर्व कामगारांना सानुग्रह अनुदान मिळण्यासाठी संप नोटीस दिली होती. त्याला अनुसरुन सहाय्यक कामगार आयुक्तांनी काल (ता. २५) महापालिका प्रशासनास पत्र देवून कामगार यूनियन पदाधिकारी यांचे बरोबर बैठक घेवून हा प्रश्न निकाली काढण्याचे सूचित केले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने काल (गुरुवारी) कामगार यूनियन पदाधिकाऱ्यांबरोबर संयुक्त बैठक घेतली. यावेळी आयुक्त यशवंत डांगे, कामगार यूनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर, बाबासाहेब मुदगल, सरचिटणीस कॉम्रेड आनंदराव वायकर, उपाध्यक्ष  नंदकुमार नेमाने, कार्याध्यक्ष  राहुल साबळे, महादेव कोतकर, बलराज गायकवाड, बाबासाहेब राशिनकर, उपाध्यक्ष अजय सौदे. अमोल लहारे आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा: महसूल प्रशासनाकडून भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

११ हजार रुपये एक रकमी देण्याचे निश्चित (Diwali Bonus)

या बैठकीत सर्व पात्र कामगारांना दिवाळी सणापूर्वी ११ हजार रुपये एक रकमी सानुगृह अनुदान देण्याचे निश्चित करण्यात आले. कालबध्द पदोन्नतीचा फरक ९३ लाख रुपये बुधवार (ता. ३१)च्या आत देण्याचे निश्चित करण्यात आले. वैद्यकीय प्रतिपूर्तीचे प्रकरण मंजूर झाल्यानंतर कुठलीही ज्येष्ठता न लावता तात्काळ संबधित कर्मचारी यांना वैद्यकीय प्रतिपूर्तीचे पैसे अदा केले जातील. सफाई कामगारांना कचरा वाहन्यासाठी ढकल गाडी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. लवकरच निवड समिती घेण्यात येवून पात्र कर्मचारी यांना पदोन्नती तसेच कालबध्द पदोन्नतीचे लाभ देण्यात येतील आदी मागण्या मान्य करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here