Diwali Bonus : कर्जत : कामगार मंत्र्यांनी (Labor Minister) घोषणा करून देखील बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस (Diwali Bonus) आजमितीस मिळाला नसल्याने गुरुवारी कर्जत येथे लोकशाही बांधकाम संघटनेच्यावतीने संस्थापक अध्यक्ष शंकर भैलुमे यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महिला-पुरुष बांधकाम मजूर (Construction Labor) सहभागी झाले होते.
अवश्य वाचा: राजेंद्र फाळकेंच्या राजीनाम्यामागे हे आहे राजकीय कारण, जाणून घ्या!
घोषणांनी दणाणून सोडला परिसर
कामगारांची दिवाळी गोड झालीच पाहिजे. कोण म्हणतंय देत आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणत आंदोलकांनी घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. राज्याचे कामगार मंत्री यांनी बांधकाम कामगारांसाठी दिवाळी सणासाठी ५ हजार रुपये बोनस देण्याची घोषणा केली होती. परंतु दिवाळी सण दोन दिवसांवर आला असून आजमितीस कामगारांच्या खात्यावर बोनस रक्कम जमा नसल्याने लोकशाही बांधकाम व इतर कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर भैलुमे त्यांचे सहकारी निसार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी कर्जतमध्ये राज्यसरकारच्या फसव्या घोषणेच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
नक्की वाचा : शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोगातून उत्पन्न वाढवावे : जिल्हाधिकारी आशिया
तहसीलदार यांना दिले मागणीचे निवेदन (Diwali Bonus)
यावेळी अनेक बांधकाम कामगारांनी तीव्र भावना व्यक्त करीत रोष व्यक्त केला. याप्रसंगी बांधकाम कामगारांची हक्काची दिवाळी झालीच पाहिजे, कामगारांची दिवाळी गोड झालीच पाहिजे, हक्काचे १० हजार बोनस सरकारने खात्यावर तात्काळ जमा केलेच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शेवटी कर्जत तहसीलदार यांना वरील मागणीचे निवेदन देण्यात आले असून आमच्या न्यायिक मागण्यांचा विचार करीत न्याय मिळावा, अशी विनंती करण्यात आली.