Dnyaneshwar Khurange : नगर : “मॉडर्न पेंटाथलॉन ही स्पर्धा केवळ क्रीडा कौशल्याची नव्हे तर शारीरिक व मानसिक समतोल राखण्याची खरी परीक्षा आहे. आजच्या युगात तरुण पिढीने मोबाईलपासून दूर राहून, अशा खेळांत सहभागी व्हावे, हेच या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट आहे. धावणे, पोहणे आणि पुन्हा धावणे या संयोजनातून खेळाडूचा खरा स्टॅमिना, सहनशक्ती आणि जिद्द उलगडते. राज्यातील सर्व खेळाडू या स्पर्धेतील आत्मविश्वास घेऊन राष्ट्रीय पातळीवर (National Level) चमकदार कामगिरी करतील, असा विश्वास जिल्हा क्रीडा अधिकारी (District Sports Officer) ज्ञानेश्वर खुरंगे (Dnyaneshwar Khurange) यांनी व्यक्त केला आहे.
नक्की वाचा : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मानस : पालकमंत्री विखे
राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचा उत्साहात प्रारंभ
अहिल्यानगर येथील वाडियापार्क जिल्हा क्रीडा संकुल येथे गुरुवारी (ता.६) राज्यस्तरीय शालेय मॉडर्न पेंटाथलॉन क्रीडा स्पर्धेचा उत्साहात प्रारंभ झाले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद अहिल्यानगर, मॉडर्न पेंटाथलॉन असोसिएशन ऑफ महाराष्ट्र राज्य संघटना आणि मॉडर्न पेंटाथलॉन असोसिएशन ऑफ अहिल्यानगर जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे बोलत होते.
अवश्य वाचा : मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; दोन संशयित ताब्यात
राज्यभरातून २७० खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद (Dnyaneshwar Khurange)
या स्पर्धेला राज्यभरातून विविध जिल्ह्यांतील २७० खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. १७ वर्ष वयोगटातील मुला-मुलींच्या गटातील स्पर्धांचे उद्घाटन जलतरण प्रशिक्षक शंकर मादगुंडी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी सुनील पूर्णपात्रे, सत्यवान जाधव, प्रवीण मोरे, हर्षद इनामदार, प्रवीण कोंढावळे, विशाल गर्जे, संतोष वाबळे, प्रियंका खिंडरे, बालाजी केंद्रे, संघटना सचिव विवेक सूर्यवंशी, सारिका गांधी, राजेंद्र कोतकर, शैलेश गवळी, संजय साठे, रावसाहेब बाबर, नंदकुमार शितोळे, अविनाश काळे यांच्यासह खेळाडू, पालक, प्रशिक्षक व क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेत खेळाडूंनी अतिशय कौशल्याने आपली कामगिरी सादर केली. स्पर्धेच्या नियमांनुसार खेळाडूंना प्रारंभी १ हजार २०० मीटर धावणे, त्यानंतर १०० मीटर जलतरण, व पुन्हा १ हजार २०० मीटर धावणे असे तीन टप्पे पार करावे लागले. शारीरिक व मानसिक क्षमतेचा कस लावणाऱ्या या पेंटाथलॉन स्पर्धेत सहभागी खेळाडूंनी प्रचंड चिकाटी व जिद्दीचे प्रदर्शन केले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी कैलास नगरकर, गोपाळ मोघे, साहिल सूर्यवंशी, आफताब सय्यद, विजय फुलमाली, प्रसाद पाटोळे परिश्रम घेत आहेत.



