Dnyaneshwar Khurange : .. तर सर्व खेळाडूंच्या चाचण्या होणार; क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांचा इशारा

Dnyaneshwar Khuranga : .. तर सर्व खेळाडूंच्या चाचण्या होणार; क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांचा इशारा

0
Dnyaneshwar Khuranga : .. तर सर्व खेळाडूंच्या चाचण्या होणार; क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांचा इशारा
Dnyaneshwar Khuranga : .. तर सर्व खेळाडूंच्या चाचण्या होणार; क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांचा इशारा

Dnyaneshwar Khurange : नगर : अहिल्यानगर जिल्हा क्रीडा संकुलात (Ahilyanagar District Sports Complex) विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. मात्र, अहिल्यानगरच्या जिल्हा क्रीडा संकुल परिसरात स्टेरॉइडचे इंजेक्शन (Steroid injections) आढळून आले आहेत. त्यामुळे अशा औषधांचा वापरामुळे खेळाडूंच्या आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होतो. त्यामुळे अशी औषधे वापरणारे खेळाडू आढळून आल्यावर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. तसेच राज्य स्तरावर तसेच जिल्हास्तरावर डोपिंग चाचणी करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविला जाणार असल्याचे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे (Dnyaneshwar Khurange) यांनी म्हटले आहे.

अवश्य वाचा: जामखेड मधील हॉटेलमध्ये गोळीबार; हॉटेल मालक गंभीर जखमी

संकुल परिसरात आढळले स्टेरॉइडचे इंजेक्शन

अहिल्यानगरच्या जिल्हा क्रीडा संकुलातील टॉयलेट तसेच इतर परिसरात स्टेरॉइडचे इंजेक्शन आढळून आले असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत अहिल्यानगर येथील ज्येष्ठ क्रीडा प्रेमींनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. यासदर्भात आय लव्ह नगरने क्रीडा अधिकारी यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली, यावेळी ते बोलत होते.

नक्की वाचा : जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही: मुख्यमंत्री

वर्षानुवर्षे खेळाचा सराव करणाऱ्यांवर अन्याय (Dnyaneshwar Khuranga)

अहिल्यानगर जिल्हा क्रीडा संकुलात विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. मात्र, अहिल्यानगरच्या जिल्हा क्रीडा संकुलातील टॉयलेट तसेच इतर परिसरात स्टेरॉइडचे इंजेक्शन आढळून आले आहेत. त्यामुळे अहिल्यानगर येथील ज्येष्ठ क्रीडा प्रेमींनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. औषधांचा खेळाडूंच्या आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच वर्षानुवर्षे खेळाचा सराव करणाऱ्यांवर अन्याय होत आहे. उत्तेजनार्थ औषधे वापरावर बंदी असतानाही असे प्रकार समोर येत आहेत. खेळाडूंचे भविष्य धोक्यात येत आहे. याबाबत संबंधित अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, प्रशासन यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. तसेच प्रत्येक खेळाडूंची स्पर्धेपूर्वी चाचणी होणे आवश्यक असल्याचे खेळाडू, तसेच पालकांनी म्हटले आहे.