Dnyaneshwari : अकोले: आधुनिकता व परंपरा (Tradition) यांची सांगड घालणार्या इंदोरी जिल्हा परिषद (Zilla Parishad) शाळेतील विद्यार्थ्यांनी (Students) अखंड हरिनाम सप्ताहनिमित्त स्वतःच्या हाताने लिहिलेल्या ज्ञानेश्वरीतील (Dnyaneshwari) ओव्या व अध्याय यांचे सप्ताह काळात प्रत्येक कीर्तनकाराच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
नक्की वाचा: यंदाही मुलींनीच मारली बाजी;बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल!
सुट्टीमध्ये शिक्षकांचा अनोखा उपक्रम (Dnyaneshwari)
प्रतिपंढरी अशी ओळख असलेल्या इंदोरी (ता.अकोले) गावात अखंड हरिनाम सप्ताह पार पडला. गावातील मुलांमध्ये बालवयातच अध्यात्माची आवड निर्माण व्हावी, ज्ञानेश्वरी ग्रंथाची ओळख व्हावी, ग्रंथाचे वाचन करावे, असे काही उद्देश समोर ठेवून जिल्हा परिषद शाळेच्यावतीने हस्तलिखित ज्ञानेश्वरी उपक्रमाचे आयोजन यावर्षीच्या सप्ताहात करण्यात आले होते. सुट्टीच्या काळात शिक्षकांनी मुलांना अध्याय लेखनाविषयी मार्गदर्शन केले. मुलांनीही उत्तम प्रतिसाद देत नियोजनाप्रमाणे एकेका अध्यायाचे लेखन केले. यानिमित्ताने मुलांना अध्यायात ओव्या किती आहेत? ज्ञानेश्वरीची भाषा कशी आहे? ओवीतील शब्दांची संख्या किती आहे? अध्याय किती आहेत? अशा अनेक गोष्टींचे ज्ञान झाले.
हे देखील वाचा: ‘६ जूनपर्यंत आरक्षण द्यावं,अन्यथा हे आंदोलन खूप मोठं होईल’- मनोज जरांगे
कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या हस्ते मुलांचा गौरव (Dnyaneshwari)
आरोही रोहम, आरोही नवले, दुर्वा येवले, पूर्वा देशमुख, अंकिता नवले, रचना नवले, काव्या वामन, श्रीराज देशमुख, आर्यन आरोटे, आराध्या मालुंजकर, प्राज्ञिक नवले, अनमोल नवले अशा तिसरी-चौथीतील मुलांनी शिक्षकांची, भावंडांची मदत घेत सुंदर हस्ताक्षरात अध्याय लिहून पूर्ण केले. उर्वरित अध्यायही पूर्ण करणार असल्याचे यावेळी सांगितले. पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांनी हरिपाठाचे लेखन करत हस्तलिखित हरिपाठ निर्मिती केली. सप्ताहात दररोज नियमितपणे कीर्तने होत. कीर्तन संपल्यानंतर महाराजांच्या हस्ते त्या दिवसाचा अध्याय लिहिणार्या मुलांचा सन्मानही करण्यात आला. सांगतेवेळी दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या हस्ते मुलांचा गौरव करण्यात आला. तसेच विठ्ठल देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकार्यांनीही मुलांचे कौतुक केले.