Do Aur Do Pyaar:’दो और दो प्यार’चा ट्रेलर रिलीज;चित्रपटात दिसणार विद्या-प्रतीकची केमिस्ट्री 

'दो और दो प्यार' चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरूवातीला भांडण आणि नंतर, धम्माल मस्ती असं पाहायला मिळत आहे. ‘चित्रपटामध्ये विद्या बालन आणि प्रतीक गांधी प्रमुख भूमिकेत आहे.

0
Do Aur Do Pyaar
Do Aur Do Pyaar

नगर : बॉलिवूडची दमदार अभिनेत्री विद्या बालनचा (Vidya Balan) येत्या १९ एप्रिलला ‘दो और दो प्यार’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना एक हटके लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. मागील काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती, त्यानंतर टीझर रिलीज झाला होता. टीझरला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer Out) प्रेक्षकांच्या आला आहे. विद्या बालन, प्रतीक गांधी, इलियाना डिक्रूझ आणि सेंथिल राममूर्ती यांची धम्माल केमिस्ट्री असलेला ‘दो और दो प्यार’चा ट्रेलर नुकताच रिलीज झालेला आहे.

नक्की वाचा : राजकुमार रावचा ‘श्रीकांत’ मधील फर्स्ट लूक प्रदर्शित; साकारणार उद्योगपती श्रीकांत बोल्लाची भूमिका

‘दो और दो प्यार’मध्ये विद्या बालन आणि प्रतीक गांधी प्रमुख भूमिकेत (Do Aur Do Pyaar)

‘दो और दो प्यार’ चित्रपटाच्या ट्रेलरच्या सुरूवातीला भांडण आणि नंतर, धम्माल मस्ती असं पाहायला मिळत आहे. ‘दो और दो प्यार’ चित्रपटामध्ये विद्या बालन आणि प्रतीक गांधी प्रमुख भूमिकेत आहे. चित्रपटामध्ये विद्या आणि प्रतीक विवाहित जोडपं आहे.पण दोघांचेही आपआपसात भांडणं होताना ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे. अशातच, दोघांचंही बाहेर एका व्यक्तीसोबत अफेयर सुरू होतं. दोघेही ही गोष्ट एकमेकांपासून कशाप्रकारे लपवतात? दोघांना ही एकमेकांचं अफेअर कळलं तर? असे अनेक प्रश्न आपल्याला ट्रेलरमध्ये पाहिल्यावर पडतील.

अवश्य वाचा : ‘महापरिनिर्वाण चित्रपटातील ‘जय भीम’गाणं प्रदर्शित

श्रीशा गुहा ठाकुरता यांनी दिग्दर्शित केला चित्रपट (Do Aur Do Pyaar)

यामध्ये विद्या बालन सेंधिलच्या प्रेमात,तर इलियाना प्रतीक गांधीच्या प्रेमात पडलेली दिसत आहे. लव्ह आणि कॉमेडी असं कथानक असलेल्या या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. विद्याचे या चित्रपटात काव्या नावाचे पात्र असून ती पेशाने डेंटिस्ट आहे. तर प्रतीक गांधी चित्रपटात अनीची भूमिका साकारत आहे. सेंथिल राममूर्ती विक्रम तर इलियाना डिक्रूझ नोरा नावाचे पात्र साकारले आहे. अ‍ॅप्लॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘दो और दो प्यार’ हा चित्रपट प्रेम, हशा आणि आधुनिक नातेसंबंधांची चमकदार कथा असणार आहे. चित्रपट निर्माता श्रीशा गुहा ठाकुरता यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट येत्या १९ एप्रिल २०२४ ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here