
नगर: झी स्टुडिओज आणि भन्साली प्रोडक्शन्सची बहुप्रतीक्षित चित्रपट ‘दो दीवाने सहर मे’ चा ट्रेलर (Do Deewane Seher Mein Trailer Release)अखेर प्रदर्शित झाला आहे. भावनिक आणि वास्तवाची झलक देणाऱ्या टीझरनंतर आता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi)आणि मृणाल ठाकूर (Mrunal Thakur)अभिनीत या चित्रपटाचा ट्रेलर प्रेमकथेची आणखी खोल बाजू उघडते आहे. ही एक अशी मॉडर्न लव्ह स्टोरी आहे जी, परिपूर्णतेच्या मागे न धावता, भावना जशाच्या तशा प्रामाणिकपणे मांडते.
नक्की वाचा: लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देणार?;देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
चित्रपटाची कथा काय ? (Do Deewane Seher Mein Trailer)
मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी यांची ही प्रेमकहाणी परीकथेसारखी न वाटता,आयुष्यातील एका खऱ्या प्रवासासारखी सादर होते. थोडीशी गुंतागुंतीची, नाजूक आणि हळूहळू बदलणारी. धावपळीच्या शहराच्या पार्श्वभूमीवर ट्रेलर दोन अशा व्यक्तींना भेट घडवतो, ज्या एकमेकांना “पूर्ण” करण्यापेक्षा समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या नात्याची वाढ शांततेतून, छोट्या नजरेतून, अपूर्ण संवादांतून होते, जे मनावर दीर्घकाळ ठसा उमटवतात.
अवश्य वाचा: निर्मला सीतारामन यांनी बजेटच्या दिवशी परिधान केलेल्या साड्यांची एवढी चर्चा का?
सोशल मीडियावर ट्रेलर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले, ट्रेलरमध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकूर यांची केमिस्ट्री अतिशय सहज आणि हृदयस्पर्शी वाटते. दोघेही असे पात्र साकारताना दिसतात, जे स्वतःलाच समजून घेण्याच्या प्रक्रियेत आहेत. प्रेमकथांमध्ये अशी प्रामाणिक मांडणी क्वचितच पाहायला मिळते.
चित्रपटात कलाकार कोण ? (Do Deewane Seher Mein Trailer)
या चित्रपटात मृणाल ठाकूर आणि सिद्धांत चतुर्वेदी प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन रवि उद्यावर यांनी केले असून, संजय लीला भन्साली, प्रेरणा सिंह, उमेश कुमार बंसल आणि भारत कुमार रंगा यांनी रवि उद्यावर फिल्म्ससोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट २० फेब्रुवारी २०२६ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.


