Dombivli MIDC Fire: डोंबिवली एमआयडीसीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आठ जणांचा मृत्यू

आगीच्या घटनेनंतर सर्वच यंत्रणा कामाला लागली असून बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

0
Dombivli MIDC Fire
Dombivli MIDC Fire

नगर : डोंबिवली पूर्वमध्ये असणाऱ्या एमआयडीसीमधील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट (boiler blast in dombivli) झाला आहे. या स्फोटामुळे डोंबिवली आणि आजूबाजूचा परिसर हादरला. हा स्फोट इतका भीषण होता की, स्फोटामुळे डोंबिवलीतील रहिवाशी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्यात. सायंकाळनंतर मृतांचा आकडा ८ वर पाेहचला असून जखमींची संख्या एकूण ६४ झाली आहे.

नक्की वाचा : राजस्थान रॉयल्सने बंगळुरुला मात देत क्वालिफायरमध्ये केला प्रवेश

 डोंबिवलीत झालेल्या बॉयलरचा स्फोटात दोन महिलांचा मृत्यू (Dombivli MIDC Fire)

डोंबिवलीतील एमआयडीसी २ फेजमधील अमुदान कंपनीत झालेल्या बॉयलरच्या स्फोटानंतर कंपनीला आगीनं वेढलं आणि संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. काही क्षणांतच आगीनं रौद्ररूप धारण करत आसपासच्या तीन ते चार कंपन्याही आपल्या जवळ घेतल्या. तर मागील बाजूस असलेल्या कारच्या शोरूममध्येही ही आग पसरली. यात मोठं नुकसान झालं असून वित्तहानी आणि जीवितहानी झाली आहे. दुपारपर्यंत दोन महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यानंतर सायंकाळी मृतांची संख्या ८ वर पाेहचली असून जखमींची संख्या ६४ झाली आहे.

अवश्य वाचा : बचावासाठी आलेली ‘एसडीआरएफ’ची टीमच बुडाली

अग्निशमन दलाचे बचावकार्य सुरु (Dombivli MIDC Fire)

आगीच्या घटनेनंतर सर्वच यंत्रणा कामाला लागली असून बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर सर्व यंत्रणांनी बचावकार्य युद्धपातळीवर हाती घेतले आहे. आठ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत. तर आतापर्यंत ६४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर परिसरातील वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here