Domestic LPG : घरगुती गॅस टाक्यांचा काळाबाजार करणारे तीन आरोपी जेरबंद

Domestic LPG : घरगुती गॅस टाक्यांचा काळाबाजार करणारे तीन आरोपी जेरबंद

0
Domestic LPG
Domestic LPG

Domestic LPG : नगर : वारुळवाडी (ता. नगर) परिसरात घरगुती वापराच्या गॅस टाक्या (Domestic LPG) अवैधरित्या व्यावसायिक गॅस टाकीत (Gas Cylinder) रिफिलिंग करतानाचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सहा लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला.

Domestic LPG

नक्की वाचा: मनोज जरांगेंना मोठा दिलासा! न्यायालयाकडून अटक वॉरंट रद्द

तीन आरोपी जेरबंद

सोहेल जाकीर शेख (वय २९, रा. पाईपलाईन हाडको, एकविरा चौक, नगर), विक्रमसिंह राजबहाद्दूर चव्हाण (वय ३५, रा. भटपुरवा उचाहाट, जि. रायबरेली, राज्य उत्तर प्रदेश), प्रल्हादसिंह पप्पूसिंह चव्हाण (वय २०, रा. चुरेबोधीसिंह, ता. सलून, जि. रायबरेली, राज्य उत्तर प्रदेश) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत.

Domestic LPG

अवश्य वाचा : महसूल व पशुसंवर्धन पंधरवडा शासनाची प्रतिमा उंचावणारा ठरेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सहा लाख ६५ हजार ५०० चा मुद्देमाल हस्तगत (Domestic LPG)

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाली होती की, वारुळवाडी येथे सोहेल शेख हा एका पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती वापरासाठीचे गॅस सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये बेकायदेशीरपणे भरून विकत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील एक लाख ६० हजार रुपये किमतीच्या ८० रिकाम्या गॅस टाक्या, एक लाख २४ हजार रुपये किमतीच्या ३१ व्यावसायिक गॅस टाक्या, सहा वजन काटे, सहा गॅस सिलेंडर रिफिलिंग मशीन व मोटार असा सहा लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला. पथकाने जेरबंद आरोपींना पुढील तपासासाठी भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here