Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षपदासाठी अपात्र

अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार ट्रम्प यांना अध्यक्षपदासाठी अपात्र घोषित करण्यात आलं आहे. कोर्टाने व्हाईट हाऊसच्या निवडणूक शर्यतीतील प्राथमिक अध्यक्षीय मतपत्रिकेतून ट्रम्प यांचं नाव काढून टाकलं आहे

0
Donald Trump Disqualified From Presidency

नगर : अमेरिकेचे (America) माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. कॅपिटल हिंसाचार प्रकरणात (Capitol Hill Violence Case) दोषी मानत कोर्टाने त्यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी अपात्र (Disqualified From Presidency) घोषित केलं आहे. त्यामुळे ट्रम्प यांना आता राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक तर लढवता येणार नाहीच, याशिवाय निवडणुकीत मतदान देखील करता येणार नाही.

नक्की वाचा :  शनिशिंगणापूर देवस्थानमधील भ्रष्टाचाराची चौकशी होणार ; शिंदे फडणवीस सरकारची घोषणा 

अमेरिकेच्या कोलोरॅडो हायकोर्टाने मंगळवारी(ता. १९) हा निर्णय दिला आहे. त्याचबरोबर रिपब्लिकन अध्यक्षीय प्राथमिक मतपत्रिकेतून त्यांचे नाव वगळण्याचे आदेशही न्यायालयाने राज्य सचिवांना दिले आहेत. ६ जानेवारी २०२१ रोजी कॅपिटल येथे दंगल भडकावल्यामुळे ट्रम्प यांना २०२४ च्या निवडणुकीसाठी राज्य मतपत्रिकेत समाविष्ट करण्यापासून रोखण्यात आले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा निर्णय ४ जानेवारीपर्यंत लागू होण्यापासून रोखले. यामुळे ट्रम्प न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात अपील करू शकतात,असं यावेळी सांगण्यात आले आहे.

अवश्य वाचा : शिवरायांचा छावा’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार ट्रम्प यांना अध्यक्षपदासाठी अपात्र घोषित करण्यात आलं आहे. कोर्टाने व्हाईट हाऊसच्या निवडणूक शर्यतीतील प्राथमिक अध्यक्षीय मतपत्रिकेतून ट्रम्प यांचं नाव काढून टाकलं आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच १४ व्या घटनादुरुस्तीच्या कलम ३ चा वापर राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला अपात्र ठरवण्यासाठी करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here