Donald Trump : अमेरिकन टेक कंपन्यांना ट्रम्प यांचा स्पष्ट इशारा; आता भारत आणि चीनसारख्या देशांमधून होणार नाही भरती

American technology companies : अमेरिकन टेक कंपन्यांना ट्रम्प यांचा स्पष्ट इशारा; आता भारत आणि चीनसारख्या देशांमधून होणार नाही भरती

0
American technology companies : अमेरिकन टेक कंपन्यांना ट्रम्प यांचा स्पष्ट इशारा; आता भारत आणि चीनसारख्या देशांमधून होणार नाही भरती
American technology companies : अमेरिकन टेक कंपन्यांना ट्रम्प यांचा स्पष्ट इशारा; आता भारत आणि चीनसारख्या देशांमधून होणार नाही भरती

Donald Trump : नगर : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून वादग्रस्त निर्णयांचा सपाटा लावला आहे. यातच त्यांनी भारताला (India) मोठा धक्का दिला आहे. वॉशिंग्टनमध्ये झालेल्या एआय परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन टेक कंपन्यांमध्ये (American technology companies) उच्च प्रशिक्षित भारतीयांच्या भरतीविरुद्ध ट्रम्प यांनी वक्तव्य केलं आहे. अमेरिकन टेक कंपन्यांना स्पष्ट इशारा दिला आहे की आता चीन आणि भारतासारख्या देशांमधून भरती केली जाणार नाही.

नक्की वाचा : धुळ्यात राडा;माणिकराव कोकाटेंच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे

दिग्गज कंपन्यांना इशारा

त्यांनी विशेषतः गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल आणि मेटा सारख्या दिग्गज कंपन्यांना इशारा दिला आहे. ट्रम्प म्हणाले की, काही कंपन्यांनी परदेशी कामगारांना प्रोत्साहन दिले आहे. ही परिस्थिती आता स्वीकारार्ह नाही. त्यांनी अमेरिकेत भारतीयांची भरती केली तर कठोर धोरणात्मक पावले उचलली जातील. विशेष म्हणजे, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यासह अनेक मोठ्या टेक कंपन्यांमध्ये भारतीय वरिष्ठ पदांवर आहेत. भारतीय तज्ञांनी अमेरिकन कंपन्यांना जगातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये स्थान दिले आहे.

अवश्य वाचा : कर्जत तालुका प्रशासनाने राशीन प्रकरणात सर्वसमावेशक तोडगा काढला

भारतातील आयटी वर परिणाम (Donald Trump)

दरवर्षी भारतातील हजारो तरुणांना अमेरिकन कंपन्यांमध्ये भरती केले जाते. जर ट्रम्प यांचे हे मनमानी धोरण लागू झाले तर त्याचा थेट परिणाम कॉलेज प्लेसमेंटपासून ते अनुभवी व्यावसायिकांपर्यंत सर्वांवर होईल. भारत हा जगातील एक प्रमुख प्रतिभा केंद्र आहे, विशेषतः अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात. ट्रम्प यांच्या या विधानानंतर, एच-1बी व्हिसाद्वारे अमेरिकेत काम करणाऱ्या लाखो भारतीय व्यावसायिकांच्या नोकऱ्या आणि भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते.

आयटी उद्द्योगांना फटका
भारतीय टेक उद्योग, विशेषतः बेंगळुरू, हैदराबाद आणि पुणे सारख्या शहरांमध्ये असलेल्या मोठ्या कंपन्या अमेरिकेच्या आउटसोर्सिंगवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. जर अमेरिकन कंपन्यांनी भारतातील त्यांचे कामकाज कमी केले किंवा नवीन भरती थांबवली तर त्यामुळे भारताच्या आयटी अर्थव्यवस्थेत मंदी येऊ शकते. त्याचा स्टार्टअप्स, सेवा क्षेत्र आणि प्रतिभा प्रशिक्षण कंपन्यांवरही नकारात्मक परिणाम होईल.

अमेरिकन कंपन्या अडचणीत
अमेरिकन कंपन्यांच्या नवोपक्रम आणि विस्तारात भारतीय अभियंते आणि विकासकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ट्रम्प यांच्या या विधानामुळं अमेरिकन टेक कंपन्यांना अडचणीत आणले आहे. एकीकडे त्यांना अमेरिकन राजकीय दबावाचा सामना करावा लागत आहे, तर दुसरीकडे भारतीय प्रतिभेवर त्यांचे अवलंबित्व दशकांपासून आहे. अशा परिस्थितीत कंपन्या त्यांची रणनीती बदलतील की ट्रम्पच्या दबावापुढे झुकतील. हे येत्या काही महिन्यांत स्पष्ट होईल.