Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ लावल्यानंतर आता भारतानेही दिले प्रत्युत्तर

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूवर ५० टक्के टॅरिफ लावल्यानंतर आता भारतानेही दिले प्रत्युत्तर

0
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूवर ५० टक्के टॅरिफ लावल्यानंतर आता भारतानेही दिले प्रत्युत्तर
Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूवर ५० टक्के टॅरिफ लावल्यानंतर आता भारतानेही दिले प्रत्युत्तर

Donald Trump : नगर : अमेरिकेचे (America) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारतावर आधी २५ टक्के टॅरिफ (Tariff) लादल्यानंतर आठवड्याभरातच त्यांनी यात २५ टक्क्यांची आणखी वाढ केली. या निर्णयाचा व्यापार जगतासह शेअर बाजारावरही (Share Market) परिणाम दिसून आला. यानंतर भारतानेही (India) प्रत्युत्तर देण्याचे ठरवले असून, भारताच्या वतीने मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेकडून खरेदी केल्या जाणाऱ्या ३.६ अब्ज डॉलर्सच्या बोईंग जेट विमान कराराला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

नक्की वाचा : वंदे भारत एक्सप्रेस आता नगरच्या स्थानकावर

प्रकल्पात जवळपास ५० टक्क्यांची वाढ

२०२१ मध्ये सहा बोईंग पी-८आय सागरी गस्त विमानासाठींचा मूळ करार २.४२ अब्ज डॉलर्सला मंजूर करण्यात आला होता. मात्र महागाई, पुरवठा साखळीत आलेले व्यत्यय आणि ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्कामुळे गेल्या काही वर्षात या करारात वाढ झाली. फायनान्शियल एक्सप्रेसने संरक्षण सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकल्पात जवळपास ५० टक्क्यांची वाढ झाल्यामुळे करार स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ट्रम्प यांनी २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर विमान खरेदीची किंमत वाढली.

अवश्य वाचा : आठवीतील विद्यार्थ्यावर वर्गमित्रांकडून चाकू हल्ला!

संरक्षण मंत्रालयाने या खरेदीला दिली स्थगिती (Donald Trump)

बोईंग खरेदीचा खर्च भरमसाठ वाढल्यामुळे संरक्षण मंत्रालयाने या खरेदीला स्थगिती दिली असून धोरणात्मक पुनर्मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. विमानाच्या सुट्या भागाच्या वाढत्या किमती, वेगाने बदलत असलेली भू-राजकीय परिस्थिती, स्वायत्तता यासारख्या घटकांचा परिणाम म्हणून करार स्थगित करण्यात आला आहे.