नगर : डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रशासनाने २ जिहादींना (Two Jihadi) व्हाईट हाऊसच्या (White house) धार्मिक स्वतंत्रता आयोगाच्या सल्लागार बोर्डावर नियुक्त केले आहे. इस्माइल रॉयर (Ismail Royer) आणि शेख हमजा (Sheikh Hamza) अशी त्यांची नावे आहेत. याचा खुलासा पत्रकार लॉरा लूमरने एक्सवर केला आहे.
नक्की वाचा : बीडमध्ये पुन्हा राडा!अपहरण करून तरुणाला बेदम मारहाण
रॉयर दहशतवादाशी संबंधित आरोपात १३ वर्ष जेलमध्ये होता.त्याच्यावर अमेरिकेविरोधात युद्धाचा कट रचणे आणि २००३ साली अल कायदा-लश्कर ए तोयबा यांना मदत करण्याचा आरोप होता. २००४ मध्ये रॉयरने शस्त्रे आणि स्फोटकांचा गैरवापर करणे, दहशतवादाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप स्वीकारला होता. त्याला २० वर्ष शिक्षा सुनावली, त्यातील १३ वर्ष त्याला जेलमध्ये राहावे लागले.
व्हाईट हाऊसने रॉयरला त्यांच्या सल्लागार कमिटीत समाविष्ट करत त्याच्याबाबत लिहिलंय की,त्याने पारंपारिक इस्लामी विद्वानासोबत मिळून धार्मिक विज्ञानचा अभ्यास केला आहे. विनालाभ इस्लामी संघटनांमध्ये त्याने एक दशकाहून अधिक काळ काम केले होते. १९९२ साली त्याने इस्लाम धर्म स्वीकारला होता. त्याचे लेखन अनेक ठिकाणी प्रकाशित झाले.
अवश्य वाचा : …तर नरकात जाऊन स्वर्ग शोधण्याची वेळ आली नसती – एकनाथ शिंदे
इस्माइल रॉयर कोण आहे? (Donald Trump)
रॉयर एक फोटोग्राफर आणि शिक्षकाचा मुलगा आहे. सेंट लुईस येथे त्याचे पालन पोषण झाले. लहान वयातच तो कट्टरपंथी च्या दिशेने आकर्षित झाला. १९९२ साली इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर रॉयरने त्याचे नाव इस्माइल ठेवले. वॉशिंग्टन डीसीमध्ये कौन्सिल ऑन अमेरिकन इस्लामिक रिलेंशससोबत काम केल्यानंतर तो देशातील गृहयुद्ध लढण्यासाठी बोस्नियाला गेला. बोस्निया तील युद्ध संपल्यानंतर रॉयर अमेरिकेला परतला. २००० साली तो पुन्हा परदेशात गेला, यावेळी तो पाकिस्तानातील लष्कर ए तोयबात भेटीला गेला होता.
शेख हमजा युसूफ नेमका कोण ?(Donald Trump)
शेख हमजा युसूफ कॅलिफोर्नियातील जैतुना कॉलेजमध्ये सहसंस्थापक होता. इस्लामी दहशतवादाशी तो जोडलेला आहे. शेख हमजा युसूफ मुस्लिम ब्रदरहूडशी लिंक आहे. ९/११ हल्ल्याच्या दोन दिवस आधी युसूफने जमील अल अमीनच्या इव्हेंटमध्ये भाषण केले होते. जमीन अल अमीनवर एका पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येचा खटला सुरू होता. युसूफने अमेरिकेवर वर्णभेदाचा आरोप केला होता. अमेरिकेवरील हल्ल्यात त्याची चौकशी ही केली होती. दहशतवादी पार्श्वभूमी असूनही शेख हमजा युसूफला ट्रम्प प्रशासनाने व्हाईट हाऊस एडवाइजरी बोर्डात सदस्य म्हणून नियुक्त केले आहे.