Donald Trump Convicted:‘हश मनी’ प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प दोषी ; ‘या’ दिवशी होणार शिक्षा  

अडल्ट फिल्म स्टार स्टॉर्मी डॅनियल्स यांनी डोनाल्ड ट्र्म्प यांच्यासोबत आपले पूर्वी संबंध असल्याचा दावा केला होता. तिने त्या संबंधिच्या अनेक गोष्टी अमेरिकेतील काही प्रकाशंकाकडे पाठवल्या होत्या.

0
Donald Trump
Donald Trump

नगर : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यतक्ष तसेच डोनाल्ड ट्र्म्प यांना मोठा धक्का बसला आहे. डोनाल्ड ट्र्म्प हे ‘हश मनी’ (Hush Money) प्रकरणामध्ये दोषी सिद्ध झालेत. या आरोपाचा निकाल देण्यापूर्वी न्यायाधीशांनी सुमारे १० तास या महत्त्वपूर्ण निकालाबाबत चर्चा केली. या प्रकरणात डोनाल्ट ट्र्म्प यांना काय शिक्षा होणार याची सुनावणी येत्या ११ जुलै (11th Jully) रोजी होणार आहे. डोनाल्ड ट्र्म्प हे गुन्हेगारी प्रकरणात दोषी आढळलेले अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिकेच्या संपूर्ण इतिहासात असे कधीही घडले नव्हते.

नक्की वाचा : अहिल्यादेवी होळकरांच्या जहागिरीतील शिलालेख उजेडात

डोनाल्ड ट्र्म्प यांचे स्टॉर्मी डॅनियल्स या पॉर्न स्टार्ससोबत केले व्यवहार (Donald Trump Convicted)

डोनाल्ड ट्र्म्प यांना स्टॉर्मी डॅनियल्स या पॉर्न स्टार्ससोबत केलेल्या व्यवहाराच्या तब्बल ३४ प्रकरणात अमेरिकन कोर्टाने त्यांना दोषी ठरवले आहे. डोनाल्ड ट्र्म्प यांनी अडल्ट फिल्म स्टार हिच्या सोबत असलेल्या पूर्वीच्या संबंधाबाबत भाष्य करु नये, म्हणून तिला त्यांनी पैसे दिले होते. २०१६ सालच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकी दरम्यानचे हे सर्व प्रकरण आहे. या प्रकरणाची गुरुवारी (ता.३०) नऊ तास अंतिम सुनावणी पार पडली. तब्बल १२ सदस्यी न्यायाधीशांनी दोन्ही बाजूची योग्य पद्धतीने जाणून घेत डोनाल्ड ट्र्म्प यांनी दोषी ठरवले. मात्र आता त्यांना या प्रकरणी कोणती शिक्षा सुनावली जाते हे ११ जुलै रोजी स्पष्ट होईल.

अवश्य वाचा : अंतरवाली सराटीत ‘संघर्षयोद्धा-मनोज जरांगे पाटील’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

काय आहे नेमके प्रकरण ? (Donald Trump Convicted)

अडल्ट फिल्म स्टार स्टॉर्मी डॅनियल्स यांनी डोनाल्ड ट्र्म्प यांच्यासोबत आपले पूर्वी संबंध असल्याचा दावा केला होता. तिने त्या संबंधिच्या अनेक गोष्टी अमेरिकेतील काही प्रकाशंकाकडे पाठवल्या होत्या. मात्र या गोष्टी अमेरिकेत चर्चेला कारण ठरु नये, असे ट्र्म्प यांना वाटत होते. म्हणून ट्र्म्प यांनी तिला १ लाख ३० हजार डॉलर्स दिले होते. त्यानंतर २०१८ साली एका जर्नलने ट्र्म्प आणि तिच्यामध्ये झालेला व्यवहार उघड केला होता. या प्रकरणानंतर ट्र्म्प यांच्यावर फौजदारी खटला चालविण्यात आला. यात कोर्टाने ६ आठवड्यांच्या कालावधीत २२ साक्षिदारांची सुनावणी घेतली होती.  त्यानंतर डोनाल्ड ट्र्म्प यांनी दोषी ठरवण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here