
Donald Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी बुधवारी (ता.३०) भारतावर २५ टक्के कर (25 Percent Tax) लागू करण्याची घोषणा (Announcement) केली होती, जी १ ऑगस्टपासून लागू होणार होती. मात्र ट्रम्प यांनी तूर्तास या नवीन कर लागू करण्याच्या निर्णयाला स्वल्पविराम दिला आहे. त्यामुळे आता भारताला एक आठवड्याचा वेळ मिळाला आहे. भारतासोबतच ७० हून अधिक देशांनाही या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. व्हाईट हाऊसने माहिती दिली आहे की, नवीन कर हा येत्या ७ ऑगस्ट २०२५ पासून लागू होईल.
नक्की वाचा : आता ‘या’ लाडक्या बहिणींना धक्का;आदिती तटकरेंनी दिली माहिती
एका आठवड्यासाठी ‘टॅरिफ’ पुढे ढकलला (Donald Trump Tariff)
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर कर लादण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. ट्रम्प यांनी १० ते ४१ टक्क्यांपर्यंतच्या कर लादण्याचा टॅरिफ‘अस्त्रा’चा आदेश नुकताच जारी केला आहे. त्यानुसार भारतावर २५ टक्के, पाकिस्तानवर १९टक्के, बांगलादेशवर २० टक्के आणि अफगाणिस्तानवर १५ टक्के कर लादला होता. परंतु, आता नवीन कर एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. ट्रम्प म्हणतात की, नवीन कर अमेरिकेला आर्थिक बळ देईल आणि व्यापार संतुलन देखील निर्माण करेल. या निर्णयामुळे अमेरिकेला आर्थिक सुरक्षा मिळेल आणि वर्षानुवर्षे सुरू असलेला व्यापारातील असमतोलही दूर होणार आहे.
अवश्य वाचा : माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवणार,कृषी खातं काढून घेतलं जाणार
अमेरिकेचा भारतावर दबाव (Donald Trump Tariff)
अमेरिकेने सध्या याच कारणासाठी भारतावर शुल्क लादले आहे, जेणेकरून ते दबाव वाढवू शकतील. दोन्ही देशांमधील व्यापार करार अजून अंतिम झालेला नाही. अमेरिका आणि भारत यांच्यात अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत. दक्षिण आणि मध्य आशियाई व्यवहारांसाठी सहाय्यक परराष्ट्र मंत्रीपद भूषवलेल्या निशा बिस्वाल यांनी असेही म्हटले होते की,अमेरिकेने शुल्क लादणे हे केवळ एक धोरणात्मक पाऊल आहे. जे भारतावर दबाव आणू शकेल.