Dr. Babasaheb Ambedkar : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे 27 जुलै रोजी अनावर; उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार – आमदार संग्राम जगताप

Dr. Babasaheb Ambedkar : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे 27 जुलै रोजी अनावर; उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार - आमदार संग्राम जगताप

0
Dr. Babasaheb Ambedkar : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे 27 जुलै रोजी अनावर; उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार - आमदार संग्राम जगताप
Dr. Babasaheb Ambedkar : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे 27 जुलै रोजी अनावर; उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार - आमदार संग्राम जगताप

Dr. Babasaheb Ambedkar : नगर : शहरातील मार्केट यार्ड चौक परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा 27 जुलै रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास होणार आहे.या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), राज्याचे जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या उपस्थितीत आणि आंबेडकरी चळवळीमध्ये राज्यातील सर्व नेते यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.

नक्की वाचा : मोठी बातमी!लाडकी बहीण योजनेतील हजारो अर्ज बाद;नव्या नोंदी बंद

पुतळ्याच्या परिसराची केली पाहणी

नगर शहराचे आमदार संग्राम जगताप व पुतळा कृती समितीच्या माध्यमातून पुतळ्याचे काम झाले असून आज या पुतळ्याच्या परिसराची पाहणी आमदार संग्राम जगताप तसेच महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता परिमल निकम पुतळा कृती समितीचे सुरेश बनसोडे, अशोक गायकवाड, माजी नगरसेवक विजय गव्हाळे, सुमेध गायकवाड , सिद्धार्थ आढाव, विलास साठे, राहुल कांबळे,माजी नगरसेवक अजय साळवे, संभाजी भिंगारदिवे, अमित काळे, किरण दाभाडे प्राध्यापक भीमराव पगारे महेश भोसले प्राध्यापक विलास साठे, विशाल कांबळे, दया गजभिये ,सागर ठोकळ,ठोकळ सर, शनेश्वर, कौशल गायकवाड,विशाल गायकवाड, पवार,संजय जगताप,प्रा.जाधव एल.बी. आंबेडकरी चळवळीचे सर्व नेते कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा : ‘त्या’ बोगस कारभाराची एसआयटी चौकशी करा; आमदार संग्राम जगताप यांची विधिमंडळात मागणी

नगरवासीयांचे अनेक दिवसांचे स्वप्न साकार (Dr. Babasaheb Ambedkar)

27 जुलै रोजी होणाऱ्या या ऐतिहासिक नेत्र दीपक सोहळा होणार असून नगरवासीयांचे अनेक दिवसांचे स्वप्न साकारले जाणार आहे. पुणे छत्रपती संभाजी नगर महामार्गावर असणाऱ्या या पूर्णकृती पुतळ्यामुळे शहराची शोभा वाढणार आहे. त्यामुळे अहिल्यानगर मधील सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे.


या नेत्र दीपक सोहळ्यास प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाण्यांची मेजवानी नगरकरांना मिळणार आहे. तसेच मार्केट यार्ड चौकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असे नामकरण करण्यात येणार असून उड्डाण पुलावर आकर्षक असे नाव या दिवशी लावण्यात येणार आहे. तसेच आकर्षक लाईटची सजावट या ठिकाणी करण्यात येणार आहे. आलेल्या सर्व आंबेडकरी अनुयांचे स्वागत करण्याची जबाबदारी महानगरपालिका प्रशासनाची असून या नेत्र दीपक सोहळ्यास सर्व नगरवासीयांनी उपस्थित राहावे असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी केले आहे.


शहरातील मार्केट यार्ड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्याची नागरिकांची मागणी होती. या अनुषंगाने पुतळा कृती समिती व आंबेडकरी चळवळी मधील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांच्या वतीने अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते या ठिकाणी अनेक अडचणी येत असताना आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून सर्व अडचणींवर मात करून अखेर या पुतळ्याचे काम पूर्णत्वास गेली असून या ऐतिहासिक क्षणासाठी सर्व आंबेडकरी अनुयायांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावावी असे आवाहन पुतळा समितीचे अध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी केले आहे.