Dr. Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण

Dr. Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्या लोकार्पण

0
Dr. Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्या लोकार्पण
Dr. Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्या लोकार्पण

Dr. Babasaheb Ambedkar : नगर : अहिल्यानगरच्या मार्केट यार्ड समोरील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते उद्या (ता.२७) सायंकाळी सहा वाजता लोकार्पण होणार आहे. या अनावरण सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती कृती समितीचे प्रमुख सुरेश बनसोडे (Suresh Bansode) यांनी दिली आहे.

नक्की वाचा : पाथर्डीत जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाचा छापा; ११ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्याची तयारी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास आली आहे. रविवारी (ता.२६) सायंकाळी सहा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रमुख पाहुणे यांचे कार्यक्रम स्थळी आगमन होणार आहे. सभा झाल्यानंतर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

अवश्य वाचा : अमेरिकन टेक कंपन्यांना ट्रम्प यांचा स्पष्ट इशारा; आता भारत आणि चीनसारख्या देशांमधून होणार नाही भरती

यावेळी परिमल निकम म्हणाले, (Dr. Babasaheb Ambedkar)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यानिमित्त होणाऱ्या जाहीर सभेसाठी मार्केटयार्ड चौकाजवळील पांझरपोळ मैदानावर भव्य स्टेज व मंडप उभारणीचे काम पूर्णत्वास आले आहे. तसेच भीमगायक आनंद शिंदे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यासाठी अहिल्यानगर मधील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीच्या सदस्यांनी केले आहे.