Dr. Babasaheb Ambedkar : नगर : हजारो वर्षे सामाजिक असमानतेच्या ओझ्याखाली दबलेल्या समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांनी न्याय दिला. मजूर, शोषित, पीडित, शेतकरी, महिला अशा सर्व वंचित घटकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यांनी संविधानाद्वारे (Constitution) दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार म्हणजे परिवर्तनाची ऊर्जा. आपण प्रत्येकाने संविधानातील मूल्ये जपली, तर समाजातील विषमता कमी होईल, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी केले.
नक्की वाचा : टीईटी सक्ती रद्द करा; शिक्षक संघटनांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
अनेक मान्यवरांची उपस्थिती
महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक क्रांतीचे जनक, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संविधान उपदेशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त यशवंत डांगे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, प्रा. माणिक विधाते, परिमल निकम, अजय साळवे, सुमेध गायकवाड, अंकुश मोहिते, सिद्धार्थ आढाव, रवींद्र कांबळे, रुपेश हरबा, संजय दिवटे, सुजन भिंगारदिवे, समीर भिंगारदिवे, सुभाष वाघमारे, कौशल गायकवाड, विशाल भिंगारदिवे, सतीश शिरसाठ, नितीन खंडारे आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा : गावठी कट्टा बाळगणारे दोघे जेरबंद; कोतवाली पोलिसांची कारवाई
सुरेश बनसोडे म्हणाले की, (Dr. Babasaheb Ambedkar)
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला वारसा केवळ पुस्तकी नाही, तर व्यवहारातील मार्गदर्शक आहे. सामाजिक न्याय, समता आणि मानवाधिकार यांची पायाभरणी त्यांनी केली. आज महापरिनिर्वाण दिनी आपण त्यांच्या विचारांची पुन्हा नव्याने उजळणी करत आहोत. समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण, रोजगार, समान संधी आणि सुरक्षितता मिळणे हेच बाबासाहेबांच्या कार्याला खरी आदरांजली आहे.



