Dr. Babasaheb Ambedkar : नगर : अमृतसर (रा.पंजाब) येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा निषेध अहिल्यानगर शहरातील समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालया (Collector’s Office) समोर निदर्शने (Demonstrations) करून, समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा (Crime) दाखल करावा तसेच मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांना देण्यात आले.
नक्की वाचा : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी पुन्हा लांबणीवर
समाजकंटकाकडून पुतळा फोडण्याचे कृत्य
प्रजासत्ताक दिनी अमृतसर मधील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर शिडीच्या सहाय्याने चढून एका समाजकंटकाने हातोड्याच्या साहाय्याने पुतळा फोडण्याचे कृत्य केले. सदर आरोपीला पोलिसांनी पकडले असून, त्याच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.
अवश्य वाचा : ‘ती’ च्या अवयवदानातून तिघांना ‘पुनर्जन्म’
मरेपर्यंत जन्मठेपची शिक्षा देण्याची मागणी (Dr. Babasaheb Ambedkar)
राज्य व केंद्र सरकार यांनी संयुक्तपणे कायदा करुन देशातील महापुरुषांचा अवमान व विटंबना करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तरतुद करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा हेतू हा राजकीय भाग असल्याचा आरोप ही यावेळी करण्यात आला आहे. त्यामुळे महापुरुषांच्या पुतळ्याचे विटंबन करणाऱ्यास मरेपर्यंत जन्मठेपची शिक्षा देण्याची मागणी आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.