Dr. Babasaheb Ambedkar : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Dr. Babasaheb Ambedkar : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

0
Dr. Babasaheb Ambedkar : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
Dr. Babasaheb Ambedkar : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Dr. Babasaheb Ambedkar : नगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) म्हणजे विचारांचा महासागर आहे. त्यांच्या प्रत्येक वचनामध्ये समतेची ज्योत आहे. अन्यायाविरोधात लढण्याचे बळ आहे. त्यांनी उच्च शिक्षण (Higher Education), संविधान (Constitution), आणि समाज परिवर्तन या माध्यमातून देशाला दिशा दिली. डॉ. बाबासाहेबांनी उच्चारलेले शब्द ही त्यांनी स्वतःच्या हक्कासाठी लढण्याची दाखवलेली वाट होती. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन सर्वांनी काम करावे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी पंकज आशिया (Pankaj Ashiya) यांनी केले आहे.

नक्की वाचा : पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार, महिला पीएसआयकडून आरोपीचा एन्काऊंटर!

प्रस्तावित पूर्णाकृती पुतळ्याचे लवकरच लोकार्पण

अहिल्यानगर महापालिकेच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त मार्केटयार्ड येथील पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया, आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार उपस्थित होते.

अवश्य वाचा : ‘सहानुभूती असेल तर काँग्रेसने मुस्लिम अध्यक्ष करावा’ -नरेंद्र मोदी

त्यांचे विचार प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक (Dr. Babasaheb Ambedkar)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा’ या मंत्रात आजही अमर ऊर्जा आहे. त्यांचे विचार प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक ठरतात. त्यांच्या विचारांची प्रेरणा, त्यांचे कार्य नव्या पिढीला माहिती व्हावेत, त्यांचे कार्य कायम स्मरणात रहावे. यासाठी मार्केट यार्ड चौकात महापालिकेकडून पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येत आहे. या प्रस्तावित पूर्णाकृती पुतळ्याचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे.