Dr. Babasaheb Ambedkar : कर्जत तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी 

Dr. Babasaheb Ambedkar : कर्जत तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी 

0
Dr. Babasaheb Ambedkar : कर्जत तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी 
Dr. Babasaheb Ambedkar : कर्जत तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी 

Dr. Babasaheb Ambedkar : कर्जत : कर्जत (Karjat) शहर आणि तालुक्यात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) चौकात भास्कर भैलुमे मित्रमंडळाच्यावतीने डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजकीय (Political), प्रशासकीय, सामाजिक पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने भीमसैनिकांनी अभिवादन केले. यावेळी “जय भीम” घोषणांनी परिसर दुमदुमला होता. तर सिद्धार्थनगर येथील आंबेडकर भवन येथे विविध उपक्रम घेण्यात आले.

नक्की वाचा : पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार, महिला पीएसआयकडून आरोपीचा एन्काऊंटर!

सिध्दार्थनगर येथे प्रतिमा पूजन करीत बुद्ध वंदना

शहरातील प्रत्येक प्रभागात यासह चौकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. सकाळी ९ वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन सिध्दार्थनगर येथे प्रतिमा पूजन करीत बुद्ध वंदना झाली. तसेच बुद्धविहार येथे वंदनेचा कार्यक्रम झाला. कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी ११ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, सामाजिक संघटना यासह भीमसैनिक उपस्थित होते.

अवश्य वाचा : ‘सहानुभूती असेल तर काँग्रेसने मुस्लिम अध्यक्ष करावा’ -नरेंद्र मोदी

परिसर निळ्या ध्वजाने सजला (Dr. Babasaheb Ambedkar)

भास्कर भैलुमे मित्रमंडळाच्यावतीने सरबत वाटप करण्यात आले. यासह शहरातील स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज चौकात माजी नगरसेवक सतीश समुद्र  मित्रमंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार याठिकाणी अजय भैलुमे मित्रमंडळ, क्रांतिसूर्य महात्मा फुले चौक, अक्काबाईनगर, शहाजीनगर, म्हसोबा गेट, राजीव गांधीनगर आदी प्रभागात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्यावतीने मिरवणूक काढण्यात आली होती. मागील चार-पाच दिवसांपासून जयंती उत्सव समितीकडून सुभान अली यांचे व्याख्यान यासह महाराष्ट्राची गौरवगाथा, भीम संध्या आणि स्वरसंगीत कार्यक्रमात भीमगीतांची मेजवानी कर्जतकरांसाठी उपलब्ध केली होती.