Dr. Jayashree Thorat : संगमनेर : कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात (Dr. Jayashree Thorat) यांची संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या (Youth Congress) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत (Kunal Raut), महाराष्ट्राचे युवक कॉंग्रेस प्रभारी उदयभानू, जिल्हा प्रभारी रोहित कुमार आणि सहप्रभारी एहसान खान यांनी ही निवड जाहीर केली. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी डॉ. जयश्री यांच्या निवडीची घोषणा केली.
हे देखील वाचा: “पुन्हा दमदाटी केली तर शरद पवार म्हणतात मला”; पवारांचा आमदार सुनील शेळकेंना इशारा
महिला आणि मुलींसाठी अल्पावधीत मोठे काम (Dr. Jayashree Thorat)
ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांवर उपचार करत असताना डॉ. जयश्री यांच्या लक्षात आले की जनजागृती अभावी कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला अनेक महिला बळी पडत आहे. या गंभीर प्रश्नावर व्यापक काम करण्याच्या हेतूने त्यांनी आरोग्य, शिक्षण आणि महिला सक्षमीकरणावर आधारित एकविरा फाउंडेशनची स्थापना केली. महिलांसाठी आरोग्य शिबिरे, व्यावसायिक प्रशिक्षण, बचत गटांना मार्गदर्शन, सायकल वाटप, शालेय साहित्याचे वितरण, क्रीडा स्पर्धा, गुणदर्शन कार्यक्रम आदी माध्यमातून त्यांनी संगमनेर तालुक्यात महिला आणि मुलींसाठी अल्पावधीत मोठे काम उभे केले आहे. सामाजिक कार्यासोबतच आमदार बाळासाहेब थोरात यांना मदतरूप भूमिका घ्यायला त्यांनी सुरुवात केली.
नक्की वाचा: कोपरगाव शहरात घरफोडीचे सत्र पुन्हा सुरू
बहुतांश प्रश्नांची सोडवणूक (Dr. Jayashree Thorat)
युवा संवाद या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील 153 गावातील प्रमुख युवक कार्यकर्त्यांच्या, दीडशेहून अधिक बैठका घेऊन त्यांनी संवाद साधला. युवासंवाद च्या माध्यमातून समोर आलेल्या बहुतांश प्रश्नांची यशोधन जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून त्यांनी सोडवणूक केली. त्या वेळीच युवकांनी डॉ. जयश्री यांना युवक काँग्रेस अध्यक्षपद स्विकारण्याचा आग्रह केला होता, त्यानंतर डॉ. जयश्री या युवक काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्या होत्या. डॉ. जयश्री यांनी कार्यकर्ता बनून संघटनेचे काम करण्याला प्राधान्य दिले, ही आनंदाची बाब आहे. त्यांच्या रूपाने युवक काँग्रेसला अभ्यासू, उच्चशिक्षित आणि सेवाभावी चेहरा मिळाला असल्याची भावना, युवक प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी व्यक्त केली.