Dr. Pankaj Ashiya : औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा : जिल्हाधिकारी डॉ. आशिया

Dr. Pankaj Ashiya : औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा : जिल्हाधिकारी डॉ. आशिया

0

Dr. Pankaj Ashiya : नगर : औद्योगिक क्षेत्रातील (Industrial Sector) उद्योजकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत. क्षेत्रात स्वच्छता राखून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची वेळेत विल्हेवाट लावावी. औद्योगिक क्षेत्रातील अतिक्रमणे तातडीने हटवून अवैधपणे व्यवसाय (Illegal business) करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी दिल्या.

नक्की वाचा: पाथर्डी शहरात फ्रॉड कॉल्सचा कहर; मोबाईलवर आले शेकडो ओटीपी

जिल्हा उद्योग मित्र समितीच्या कामाचा आढावा

श्रीरामपूर येथील औद्योगिक क्षेत्र कार्यालयात जिल्हा उद्योग मित्र समितीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस एमआयडीसीचे विभागीय अधिकारी गणेश राठोड, महाव्यवस्थापक दीपक शिवदास, व्यवस्थापक अशोक बेनके, क्षेत्र व्यवस्थापक दिलीप काकडे, उपअभियंता संदीप बडगे, पोलीस निरीक्षक एन. बी. देशमुख तसेच श्रीरामपूर उद्योजक संघटनांचे पदाधिकारी बाबासाहेब काळे, प्रकाश गांधी, नंदकुमार शिंदे, हरदीप सिंग आदी उपस्थित होते.

आवश्य वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने व सर्व मांस विक्री केंद्र दोन दिवस बंद

जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, (Dr. Pankaj Ashiya)

औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन केंद्र, पथदिवे, रस्ते, ड्रेनेज यांसह इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. वाढीव पाणीपुरवठ्याची मागणी मान्य व्हावी यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करून पाठविण्यात यावा. औद्योगिक क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभागाने समन्वयातून काम करावे व गस्त वाढवावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिले.