Dr. Pankaj Ashiya : नगर : अधिकाऱ्यांनी सध्यस्थितीत सुरू असलेली व प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करावी. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी जनहिताच्या कामांच्या माध्यमातून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी दिल्या.
अवश्य वाचा: राजेंद्र फाळकेंच्या राजीनाम्यामागे हे आहे राजकीय कारण, जाणून घ्या!
तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा
अहिल्यानगर तहसील कार्यालयात तालुक्यातील विविध विकासकामांचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, पोलीस उपअधीक्षक (ग्रामीण) शिरीष वमणे, शहर पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे व तहसीलदार संजय शिंदे उपस्थित होते.
नक्की वाचा : शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोगातून उत्पन्न वाढवावे : जिल्हाधिकारी आशिया
तहसील कार्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा (Dr. Pankaj Ashiya)
या बैठकीत पिण्याचा पाणीपुरवठा, रस्ते बांधकाम, सिंचन प्रकल्प, आरोग्य सेवा, शिक्षण सुविधा, ग्रामविकास योजना, स्वच्छ भारत मिशन, कृषी क्षेत्रातील प्रगत उपक्रम व इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व योजनांची कार्यक्षम अंमलबजावणी सुनिश्चित करून नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असे निर्देश दिले. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त तहसील कार्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.