
Dr. Pankaj Ashiya : नगर : जिल्हा उद्योग मित्र समितीच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector’s Office) आयोजित बैठकीत घेतला.
अवश्य वाचा : ‘त्या’ दोन्ही डॉक्टरांचा जामीन अर्ज मागे
संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित
बैठकीस महाव्यवस्थापक दीपक शिवदास, औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी गणेश राठोड, व्यवस्थापक श्याम बिराजदार, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी यांच्यासह अशासकीय सदस्य व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
नक्की वाचा : सुनीता भांगरे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, (Dr. Pankaj Ashiya)
औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांना आवश्यक त्या सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. औद्योगिक क्षेत्रासह शहरालगत असलेल्या ग्रामपंचायतीमधील कचऱ्यासाठी स्वतंत्र डंपिंग यार्ड निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
औद्योगिक क्षेत्रात असलेल्या फीडरची आवश्यकते प्रमाणे दुरुस्ती करत या भागात अखंडपणे वीज पुरवठा सुरू राहावा, तसेच पाणी पुरवठाही सुरळीत राहण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात. बोल्हेगाव रस्ता दुरुस्ती, सनफार्मा ते निंबळक रस्ता दुरुस्ती या बरोबरीने औद्योगिक क्षेत्रातील उर्वरित अतिक्रमणे तातडीने हटविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी यावेळी दिल्या.


