Dr. Pankaj Ashiya : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी विभाग कटिबद्ध : डॉ. आशिया

Dr. Pankaj Ashiya : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी विभाग कटिबद्ध : डॉ. आशिया

0
Dr. Pankaj Ashiya : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी विभाग कटिबद्ध : डॉ. आशिया
Dr. Pankaj Ashiya : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी विभाग कटिबद्ध : डॉ. आशिया

Dr. Pankaj Ashiya : अकोले : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आदिवासी विकास विभाग (Tribal Development Department) कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी केले. आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे (Raghoji Bhangare) क्रीडा नगरी शैक्षणिक संकुल मवेशी येथे 25 ते 27 डिसेंबर अखेर संपन्न होणार्‍या राजूर प्रकल्पस्तरीय आश्रमशाळा क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी अध्यक्षस्थानाहून बोलत होते. याप्रसंगी तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, सरपंच यमाजी भांगरे, सामाजिक कार्यकर्ते अनिल भांगरे उपस्थित होते.

अवश्य वाचा: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून बेदम मारहाण; श्रीरामपूर शहरात खळबळ

जिल्हाधिकारी डॉ. आशिया पुढे म्हणाले,

आपले आदिवासी विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात प्रगती करत आहेत. पण त्याचबरोबर त्यांच्यातील नैसर्गिक अंगीकृत गुण खेळामध्ये आहेत. राजूर आदिवासी प्रकल्पात चांगले खेळाडू घडत आहेत. त्याच्यासाठी जिल्ह्याच्या डीपीडीसीच्या योजनेंतर्गत आश्रमशाळेसाठी  क्रीडा संकुल उभे करून खेळाडूंना प्रोत्साहन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धेत आपण सर्व खेळाडूंनी खिलाडू वृत्तीने भाग घेऊन यश संपादन करावे. ही क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांसाठी एक सुवर्णसंधी आहे. ही स्पर्धा केवळ शारीरिक क्षमतेची परीक्षा नाही तर ती आपल्या अंगी असलेल्या सांघिक भावना, जिद्द आणि शिस्त दाखविण्याची एक महत्वाची पायरी आहे.

नक्की वाचा : डिजिटल अरेस्ट ऑनलाईन फसवणूक प्रकरणात तिघे जेरबंद

राज्यस्तरीय स्पर्धांचा दर्जा (Dr. Pankaj Ashiya)

प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे म्हणाल्या, आदिवासी विकास विभागाच्या स्पर्धांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्यावतीने 22 एप्रिल, 2015 रोजी राज्यस्तरीय स्पर्धांचा दर्जा देण्यात आला. या शासन निर्णयामुळे राज्यस्तरावर प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय व निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी 5 टक्के आरक्षण मिळाले आहे. आपल्या विभागातील अनेक खेळाडूंनी या संधीचा लाभ घेतलेला आहे. तसेच राज्यस्तरावर प्राविण्यप्राप्त खेळाडूला दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत सवलतीने 15 गुण मिळतात याचाही लाभ आपल्या अनेक खेळाडूंनी घेतलेला आहे. आपणही या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी प्रकाश ढोणे, मनोजकुमार पैठणकर, सर्व प्रकल्पस्तरीय समित्यांचे अध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.