Dr. Pankaj Ashiya : नगर : जिल्ह्यातील उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ (International Market) मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून (Administration) सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी सांगितले.
नक्की वाचा : पुण्यातील सराईत गुन्हेगार अहिल्यानगरमध्ये गजाआड
निर्यात व मैत्री कार्यशाळेत ते बोलत होते
शहरातील अहमदनगर ॲटो अँड इंजिनिअरिंग क्लस्टर येथे आयोजित निर्यात व मैत्री कार्यशाळेत ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक दीपक शिवदास, अतिरिक्त कामगार आयुक्त तथा समन्वय अधिकारी (मैत्री सेल, मुंबई) भास्कर मोराडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा दुग्धविकास अधिकारी गिरीश सोनोने, डीजीएफटी विभाग प्रमुख मंदा शेटे, पशूसंवर्धन उपायुक्त उमेश पाटील आदी उपस्थित होते.
अवश्य वाचा : पिस्तुल दाखवत व्यापाऱ्याला धमकावले; सहा जणांवर गुन्हा
शेतकरी व व्यावसायिकांना प्रोत्साहन (Dr. Pankaj Ashiya)
जिल्ह्याला जागतिक निर्यातीच्या नकाशावर ओळख मिळावी आणि जिल्ह्यातील उद्योजक, शेतकरी व व्यावसायिकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याचे डॉ. आशिया म्हणाले. या कार्यशाळेत उद्योजकांना निर्यातविषयक प्रशिक्षण देऊन सक्षम करण्यावर भर देण्यात आला. या माध्यमातून जिल्ह्यातील उत्पादने जागतिक पातळीवर पोहोचविण्यास मदत होईल. कार्यशाळेतून उद्योजकांना मोठा फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी विद्या बाडीगर व अरुल कान्हेरे यांनी निर्यात प्रक्रियेतील टप्प्यांविषयी सविस्तर माहिती दिली. निर्यात सल्लागार दानिश शेख यांनी नवोद्योगांनी व्यवसायाची सुरुवात कशी करावी, यावर मार्गदर्शन केले. ईवाय कन्सल्टन्सीचे सूरज जाधव यांनी जिल्ह्यातील निर्यातीच्या संधी व सद्यस्थितीचा आढावा सादर केला.
भास्कर मोराडे यांनी ‘महाराष्ट्र इंडस्ट्री, ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेल’ (MAITRI) पोर्टलच्या माध्यमातून मिळणाऱ्या सुविधांची माहिती दिली. श्री. पुरी व श्री. देशमुख यांनी कृषी उत्पादनांच्या निर्यातीतील संधी व विपणन व्यवस्थेवर मार्गदर्शन केले. मॅगनेट उपक्रमाची माहिती सनी काटे यांनी दिली. जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक खलील हवालदार यांनी रोजगाराशी संबंधित शासकीय योजनांची माहिती दिली. यावेळी महाव्यवस्थापक दीपक शिवदास यांनी कार्यशाळा आयोजित करण्यामागची भूमिका विषद केली.
कार्यशाळेची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिक, नवउद्योजक, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रवर्तक व सभासद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्रात उपस्थितांनी आपल्या शंकांचे समाधान करून घेतले. जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक अण्णासाहेब बेरे यांनी मान्यवर व सहभागींचे आभार मानले.