Dr. Pankaj Ashiya : नगर : सुपा औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांचे (Supa MIDC) प्रश्न प्राधान्याने सोडवावेत. उद्योगांना कुठलाही त्रास होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था (Law and Order) अबाधित राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी दिले. जिल्हा उद्योग मित्र समितीच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी यांनी सुपा औद्योगिक वसाहतीमधील मिंडा इंडस्ट्रीज येथे घेतला. यावेळी ते बोलत होते.
नक्की वाचा : श्रीगोंदा तालुक्यातील लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू; कोलकाता येथे होणार अंत्यसंस्कार
औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित
यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक दीपक शिवदास, व्यवस्थापक अशोक बेनके, श्याम बिराजदार, विभागीय अधिकारी गणेश राठोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गुंजाळ, तहसीलदार गायत्री सौंदाणे, एमआयडीसीचे उपअभियंता संदीप बडगे, सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, विद्युत विभागाचे रमेश पवार, तसेच उद्योजक अनुराग धूत, प्रकाश गांधी, जयद्रथ खकाळ, हरजीत सिंग वाधवा व औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
अवश्य वाचा : अहिल्यानगर तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
डॉ. आशिया म्हणाले, (Dr. Pankaj Ashiya)
औद्योगिक क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलीस विभागाने समन्वयातून कार्य करावे. क्षेत्रात पोलिसांची गस्त वाढवावी. यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
औद्योगिक क्षेत्रात अखंडित वीजपुरवठा होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. अतिरिक्त दाबाचा वीजपुरवठा आवश्यक असलेल्या उद्योगांचे प्रस्ताव मंजूर करण्यात यावेत. औद्योगिक रस्त्यांवर पावसाचे पाणी उद्योग परिसरात जात असल्याने निचऱ्याची कामे तातडीने करावीत. पथदिवे सतत कार्यरत राहतील यासाठी दक्षता घ्यावी. अहिल्यानगर व सुपा औद्योगिक क्षेत्रातील ट्रक टर्मिनल व कामगार रुग्णालयाच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करावा, असेही त्यांनी सांगितले.