Dr. Pankaj Ashiya : जिल्ह्यात जादुटोणा विरोधी कायद्याची जागृती करा : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

Dr. Pankaj Ashiya : जिल्ह्यात जादुटोणा विरोधी कायद्याची जागृती करा : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

0
Dr. Pankaj Ashiya : जिल्ह्यात जादुटोणा विरोधी कायद्याची जागृती करा : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
Dr. Pankaj Ashiya : जिल्ह्यात जादुटोणा विरोधी कायद्याची जागृती करा : जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

Dr. Pankaj Ashiya : नगर : जादूटोणा (Witchcraft), अंधश्रद्धा व अघोरी प्रथा या समाजाच्या प्रगतीस अडथळा ठरतात. त्यांचे उच्चाटन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी जिल्ह्यात सर्वदूर जनजागृती (Public Awareness) करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांनी केल्या आहेत.

नक्की वाचा : भंडारदराला जाण्यासाठीच्या वाहतुकीत बदल

संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित

जिल्हास्तरीय जादूटोणा विरोधी जनजागृती, प्रचार व प्रसार समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण प्रविण कोरगंटीवार, उपविभागीय पोलीस अधिकारी वैभव कलबुर्गे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

अवश्य वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती

डॉ. आशिया म्हणाले, (Dr. Pankaj Ashiya)

महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व त्याचे समूळ उच्चाटन होण्यासाठी अधिनियम २०१३ जारी करण्यात आला आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी समितीच्या माध्यमातून शाळा व महाविद्यालयात व्याख्याने व कार्यक्रमांचे आयोजन करावे. तसेच ग्रामीण भागातही या कायद्याबाबत प्रभावीपणे जागृती व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.