Dr. Praveen Gedam | रोजगार निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांवर भर द्या : डॉ. प्रवीण गेडाम

0
Dr. Praveen Gedam

Dr. Praveen Gedam | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्हा विकास आराखड्याबाबत जिल्हा वार्षिक योजनेतील राखीव निधीचा विनियोग करताना विविध योजनांचे अभिसरण करून आर्थिक व सामाजिक उद्दिष्टे पूर्ण करण्यावर भर द्यावा आणि विकास आराखड्यात रोजगार निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांवर भर द्यावा, अशा सूचना नाशिक (Nashik) विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम (Dr. Praveen Gedam) यांनी केल्या.

हेही वाचा – राज्यातील मंत्र्यांचे खाते वाटप जाहीर; राधाकृष्ण विखे पाटलांकडे जलसंधारण विभाग

बैठकीला उपस्थिती (Dr. Praveen Gedam)

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरिकर, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, जिल्हा मृद व  जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसामुद्रे आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा – अपहरण करणारे आरोपी २४ तासात जेरबंद

जिल्हा विकास आराखड्याच्या नियोजनाबाबत आढावा (Dr. Praveen Gedam)

यावेळी डॉ.गेडाम यांनी जिल्हा विकास आराखड्याच्या नियोजनाबाबत आढावा घेतला. ते म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाला चालना देणाऱ्या कामांचा प्राधान्याने विचार व्हावा. विविध योजनांच्या अभिसरणाद्वारे विकासाचे नियोजित उद्दिष्ट पूर्ण होईल, आणि त्या भागातील नागरिकांना त्याचा लाभ मिळेल याचा विचार विकास आराखड्यात असावा. त्यासाठी प्राधान्याच्या विशिष्ट विकास प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करून त्यासाठी आवश्यक सुविधा उभाराव्यात. विविध शासकीय,अशासकीय संस्थांची मदत घेऊन कृषी आणि दुग्ध व्यवसाय आधारित क्लस्टरमधून निर्यात करण्याबाबत शक्यतांचा विचार व्हावा, अशा क्लस्टरच्या विकासासाठी अपेक्षित सुविधा उभारण्यावर भर द्यावा. एखाद्या क्षेत्राचा विकास करताना त्यासाठी आवश्यक अत्याधुनिक सुविधांचा विकास करण्याकडे अधिक लक्ष द्यावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here