Dr. Rajendra Pipada : पिपाडा यांचे गडकरी यांना निवेदन; रस्त्याच्या रुंदीबाबत व्यक्त केली चिंता

Dr. Rajendra Pipada : पिपाडा यांचे गडकरी यांना निवेदन; रस्त्याच्या रुंदीबाबत व्यक्त केली चिंता

0
Dr. Rajendra Pipada : पिपाडा यांचे गडकरी यांना निवेदन; रस्त्याच्या रुंदीबाबत व्यक्त केली चिंता
Dr. Rajendra Pipada : पिपाडा यांचे गडकरी यांना निवेदन; रस्त्याच्या रुंदीबाबत व्यक्त केली चिंता

Dr. Rajendra Pipada : राहाता : शिर्डी–अहिल्यानगर मुख्य रस्त्यावर (Shirdi-Ahilyanagar Main Road) साईड गटार रस्त्याच्या मध्यभागी घेतल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. तसेच रस्त्याचे काम संथ गतीने चालू असल्याने लोकांचे अपघात होत आहे. धुळीच्या त्रासानेही लोक हैरान झाले असल्याने आपण या प्रकारात लक्ष घालावे अशी मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे डॉ. राजेंद्र पिपाडा (Dr. Rajendra Pipada) यांनी समक्ष भेटून केली.शिर्डी–अहिल्यानगर या अत्यंत महत्त्वाच्या मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या साईड गटाराच्या कामामुळे रस्त्याची प्रत्यक्ष वापरातील रुंदी कमी होत असल्याबाबत चिंता व्यक्त करत डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची समक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले.

नक्की वाचा : आचार्यश्रींच्या पुण्यस्मृतीनिमित्त आनंदधाम येथे भगवान महावीर व्याख्यानमालेचे आयोजन

अतिक्रमणे वाढण्याची शक्यता (Dr. Rajendra Pipada)

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गेल्या २५ वर्षांपासून या रस्त्याने हजारो लोकांचे बळी घेतले अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, हा रस्ता नसून मौत का कुआ झालेला आहे. जीव मुठीत घेऊन प्रवाशांना या रस्त्याने प्रवास करावा लागतो. ठेकेदार संथ गतीने काम करत असल्याने अपघातांची संख्या अजून वाढली आहे. डॉ. पिपाडा यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, रस्त्याच्या कडेला गटार न घेता ते रस्त्याच्या मध्यापासून अवघ्या ९ मीटर अंतरावर बांधण्यात येत असल्यामुळे रुंद असलेला रस्ता कृत्रिमरीत्या अरुंद केला जात आहे. नगरपरिषद हद्दीत रस्त्याच्या मध्यापासून किमान १२ मीटर अंतरावर साईड गटार घेण्यात यावे, जेणेकरून रस्त्याची मूळ रुंदी कायम राहील व भविष्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेता सुरक्षितता सुनिश्चित होईल. त्यामुळे सध्याची वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याबरोबरच भविष्यात त्या ठिकाणी अनधिकृत अतिक्रमणे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अवश्य वाचा : पाणी आरक्षण व आवर्तनावरून निळवंडे कृती समिती आक्रमक; अधिकाऱ्यांना निवेदन

परिसरात प्रचंड प्रमाणात धुळ

शिर्डी ते अहिल्यानगर हा रस्ता राहाता शहरातून जात आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात जड व हलकी वाहतूक सुरू असते. याच मार्गावर शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, आठवडे बाजार, व्यापारी संकुले तसेच दाट लोकवस्ती असल्यामुळे हा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील मानला जातो. अशा परिस्थितीत रस्त्याची रुंदी कमी होणे हे भविष्यात वाहतूक कोंडी आणि अपघातांना आमंत्रण देणारे ठरू शकते. संथ गतीने सुरु असलेल्या शिर्डी–अहिल्यानगर मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या कामांमुळे परिसरात प्रचंड प्रमाणात धुळ उडत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

गडकरी यांचा सकारात्मक प्रतिसाद

दिवसेंदिवस वाढणाऱ्या या धुळीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व प्रवाशांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ आणि इतर आजारांना सामोरे जावे लागत आहे. संबंधित यंत्रणेकडून कोणत्याही प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तत्काळ पाणी फवारणी, रस्त्यांची स्वच्छता व कामांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यात यावी.. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. यावेळी झालेल्या चर्चेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विषयाची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला असून संबंधित अधिका-यांना याबाबत सुचना करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती डॉ. पिपाडा यांनी दिली.