
Dr. Sampada Munde Suicide Case : पाथर्डी : सातारा जिल्ह्यातील फलटण येथे घडलेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी (Dr. Sampada Munde Suicide Case) दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक (एसआयटी) (SIT) मार्फत करण्यात यावी, या मागणीसाठी पाथर्डी शहरातील नाईक चौकात सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध सभा घेण्यात आली. यावेळी विविध समाजसेवक, नागरिक व पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला. या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (Devendra Fadnavis) यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
अवश्य वाचा : हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?
निवेदनात म्हटले आहे की,
डॉ. संपदा मुंढे या उच्चशिक्षित तरुण डॉक्टर होत्या, त्यांना काही वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच काही राजकीय नेत्यांकडून सतत त्रास दिला जात होता. या मानसिक छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या हातावरच संबंधित दोषींची नावे लिहून ठेवली असून, ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळिमा फासणारी असल्याचे निवेदनात नमूद आहे.
नक्की वाचा : हद्दीबाहेरील मतदारांचा समावेश होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी : आयुक्त डांगे
निष्क्रिय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी (Dr. Sampada Munde Suicide Case)
यापूर्वी डॉ. मुंडे यांनी १९ जून २०२५ रोजी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात पोलीस उपविभागीय अधिकारी (DYSP) यांच्याकडे तक्रार दिली होती. मात्र, त्या तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आली नाही किंवा चौकशीही करण्यात आली नाही. त्यामुळे या निष्क्रिय DYSP अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, आत्महत्येच्या चिठ्ठीत ज्यांची नावे नमूद आहेत, त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे. केवळ निलंबनावर तोडगा निघणार नाही. तसेच, धमकी देणारे संबंधित राजकीय व्यक्ती आजी किंवा माजी खासदार असो त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करावी. या प्रकरणातील दोषींवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच, जर आठ दिवसांच्या आत दोषींवर ठोस कारवाई करण्यात आली नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. नारायण महाराज गर्जे, प्रा. सुनील पाखरे, किसान आव्हाड, नागनाथ राजे गर्जे, चांद मणियार, अरविंद सोनटक्के, संदीप पालवे, गोरक्ष ढाकणे, भास्कर दराडे, किशोर हरेर, सुखदेव मार्गाने, अतुल जगताप, नगरसेवक रमेश गोरे, सुरेश नागरे, राहुल वायकर, मुरलीधर बडे, जुनेद शौकत आणि देविदास शिरसाठ आदींच्या स्वाक्षरीने हे निवेदन मुख्यमंत्री कार्यालयात पाठविण्यात आले.


