Dr. sharad kolate : नगर : “आपला देह ही एक बासरी आहे त्याद्वारे स्वतः ला आपले स्वर लावता आले पाहिजेत,” असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ (Senior Educationist) डॉ. शरद कोलते (Dr. sharad kolate) यांनी केले.
अवश्य वाचा : राशीनमध्ये सुगंधी तंबाखू आणि गुटखा पकडला; साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
श्री गुरूमाऊली संगीत विद्यालयातर्फे वार्षिक महोत्सव
अहिल्यानगर येथील श्री गुरूमाऊली संगीत विद्यालयातर्फे वार्षिक महोत्सवा अंतर्गत भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यप्रकारातील ‘संपूर्ण मार्गम’ हा कलाविष्कार सादर करण्यात आला. अहिल्यानगरच्या माऊली सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. शरद कोलते ह्यांनी अध्यक्षपद भूषविले. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून रामायणाचार्य गोरक्षनाथ दुतारे महाराज, चिंतामणी हॉस्पिटलचे डॉ. सी. बी. कुलकर्णी, डॉ. गौरी कुलकर्णी, भारत भारतीचे पश्चिम प्रांतचे उपाध्यक्ष कमलेश भंडारी, शिरूर येथील प्रथितयश डॉ. स्मिता कवाद आणि डॉ. रुपाली मगर तसेच अहिल्यानगर येथील उद्योजक धनेश बोगावत, अशोक गांधी (जरिवाला) आदी उपस्थित होते.
नक्की वाचा : नगरकरांमध्ये अजूनही मोटर सायकलचीच क्रेझ; कारपेक्षा ट्रॅक्टरला मागणी जास्त
भरतनाट्यम मधील विविध पारंपरिक रचना सादर (Dr. sharad kolate)
प्रथमतः मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन व नटराज मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर नृत्याच्या कार्यक्रमात भरतनाट्यम मार्ग मधील विविध पारंपरिक रचना सादर केल्या गेल्या. त्यात भरतनाट्यम मधील सुरुवातीचे ‘अडवू’ पासून ते ‘ तिल्लाना व मंगलम’ पर्यंतचा संपूर्ण प्रवास “सन्मार्गम्” या शीर्षकाला साजेसा असा नृत्याविष्कार अगदी सुंदर रित्या गुंफला गेला. भरतनाट्यम मार्गम मधील पारंपरिक रचनांमध्ये पुष्पांजली, अलारिप, जतीस्वरम्, शब्दम्, कीर्तनम, पदम, वर्णम, मधूराष्टकम् व शेवटी तिल्लाना व मंगलम या भरतनाट्यमच्या रचना क्रमाने सादर केल्या.
कमलेश भंडारी म्हणाले की, वर्षाच्या मागे त्यांचे पती चंद्रकांत खंबीरपणे उभे असतात. देहभान विसरून जेव्हा आपण कलेद्वारे भगवंताची पूजा करतो तेव्हा ती कला भगवंतापर्यंत निश्चित पोहोचते. या विद्यालयातून नृत्य कलेचे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा आत्मविकास होवो आणि त्याची परिणीती आत्मसाक्षात्कारात होत जावो! अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. या महोत्सवात विद्यालयाच्या संचालिका नृत्यतपस्वी गुरु वर्षा चंद्रकांत पंडित या स्वतः व त्यांच्या विद्यालयाच्या सर्व शाखांच्या एकूण ९५ विद्यार्थिनींनी भरतनाट्यमचा ‘अडवू’ पासून ते ‘ तिल्लाना ‘ पर्यंतचा संपूर्ण प्रवास “सन्मार्गम् ” या अंतर्गत अगदी सुंदर रित्या सादर केला. सर्व नृत्याविष्कारांना रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली.