Dr. Sonali Bangar : मोजका आहार व सदाचार ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली : डॉ. सोनाली बांगर

Dr. Sonali Bangar

0
Dr. Sonali Bangar : मोजका आहार व सदाचार ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली : डॉ. सोनाली बांगर
Dr. Sonali Bangar : मोजका आहार व सदाचार ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली : डॉ. सोनाली बांगर

Dr. Sonali Bangar : नगर : योग (Yoga), प्राणायाम, व्यायाम, मोजका आहार व सदाचार हे निरोगी आयुष्याचे गुपित असल्याचे प्रतिपादन जिल्हा आयुष रुग्णालयाच्या (District AYUSH Hospital) वैद्यकीय अधीक्षक डॉ. सोनाली बांगर (Dr. Sonali Bangar) यांनी केले.

अवश्य वाचा: लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या क्रूरतेचा कळस; खून करून मृतदेह पुरल्याचे तपासात उघड

रुग्णालयात १० वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा

जिल्हा आयुष रुग्णालयात १० वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी डॉ. बांगर बोलत होत्या. कार्यक्रमास स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. भारती पेचे, प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ भूषण देशमुख, बालरोगतज्ज्ञ डॉ. उज्ज्वला शिरसाठ, भूलतज्ज्ञ डॉ. लक्ष्मी टायरवाले, डॉ. अर्चना लांडे – देशमुख आदी उपस्थित होते..

नक्की वाचा : लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी ? जाणून घ्या सविस्तर…

डॉ. बांगर म्हणाल्या, (Dr. Sonali Bangar)

रुग्णालय सुरू झाल्यापासून आजपर्यंत ७० हजाराहून अधिक नागरिकांनी उपचारांचा लाभ घेतला आहे. उपचारांमध्ये औषधाइतकेच आहार-विहार व मानसिक सदाचारालाही महत्त्व आहे, असे त्यांनी नमूद केले. ‘लोक व पृथ्वीच्या आरोग्यासाठी आयुर्वेद’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. अर्चना लांडे म्हणाल्या की, आयुर्वेद केवळ मनुष्यांसाठीच नव्हे तर सर्व सृष्टीसाठी उपयुक्त आहे. निसर्गपूरक आयुर्वेदीय जीवनशैली माणसाचे आरोग्य जपते व निसर्गाचेही संरक्षण करते.


डॉ. भारती पेचे यांनी सांगितले, आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नसून एक जीवनशैली आहे. आपल्या सण – उत्सवांमधील आचार – विचारांमध्ये आयुर्वेद रुजलेला आहे. भूषण देशमुख यांनी जिल्ह्यातील प्राचीन औषधी वनस्पतींबाबत माहिती दिली. आयुष रुग्णालय हे आयुर्वेद सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी माध्यम ठरू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शौनक मिरीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. नाझिया शेख यांनी केले. यावेळी जिल्हा आयुष रुग्णालयाच्या डॉ. जयश्री मस्के, डॉ. हरलीन कौर पुरी, डॉ. शोभा धुमाळ, अजिंक्य पवार, अविनाश नाबदे, अजिंक्य भिंगारदिवे, हर्षा फाळके, अनिकेत भडके, एलिझाबेथ तेलधुणे, संगीता नन्नवरे, चैतन्य निकम, अश्विनी बोरगे, योगिता कदम, विशाल केदारी, वर्षा जाधव, पूजा भोसले, अश्विनी निमसे, सागर सुळ, विलास कनकुटे आदींनी परिश्रम घेतले.